मुंबई, 10 जून: मुंबईत बुधवारी दिवसभर मुसळधार पाऊस झाला. त्यानंतर (Heavy rain in Mumbai) मुसळधार पावसामुळे मालाडमधील एका चार मजली चाळीचा (Residential structures) काही भाग कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. मालाडच्या मालवणी भागात ही घटना घडली. या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला असून 17 जण गंभीर जखमी झालेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. (Malad Building Collapsed) या दुर्घटनेवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. तसंच दुर्घटनेस्थळी भेट देणार असल्याचं सांगितलं आहे. पत्रकार परिषद घेऊन महापौरांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
मालाड येथे झालेली दुर्घटना अत्यंत दुर्देवी आहे. मालाडमध्ये जे घडले त्यामागील दोषींनी त्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. तिथे कोणाचं प्रशासन आहे हे पाहण्यापेक्षा या घटनेला कोण जबाबदार आहे पाहणं जास्त महत्त्वाचं आहे. जर प्रत्येकानं जबाबदारी घेतली असती तर ही घटना घडली नसतील, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्यात.
Culprits behind what happened in Malad (building collapse incident) should take responsibility for it. More than looking into whose administration was there, it should be seen that who was responsible for it. Had everyone been responsible, it wouldn't have happened: Mumbai Mayor pic.twitter.com/yHRzpCtjY2
— ANI (@ANI) June 10, 2021
दरम्यान किशोरी पेडणेकर या घटनास्थळी जाऊन भेट घेणार आहेत. त्याचबरोबर मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे ही घटनास्थळी जाणार असल्याचं किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं.
हेही वाचा- मुंबईत कोसळू शकतात या 21 इमारती, म्हाडाकडून यादी जाहीर
न्यू कलेक्टर (New Collector compound) कंपाऊंटमधील चार इमारतीचा काही भाग कोसळला. दरम्यान मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दुर्देवानं मृतांमध्ये 6 लहांना मुलांचा समावेश असून या लहानग्यांचं वय 10 वर्षाच्या आत आहे.
मालाड इमारत दुर्घटनेतील मृतांची यादी
1. साहिल सर्फराज सय्यद (पु) – 9 वर्ष
2. अरिफा शेख- 8 वर्ष
3. अज्ञात (पु) – 40 वर्षे
4. अज्ञात (पु)- 15 वर्षे
5. अज्ञात (स्त्री)- 8 वर्षे
6. अज्ञात (स्त्री) – 3 वर्षे
7. अज्ञात (स्त्री) – 5 वर्षे
8. अज्ञात (स्त्री) – 30 वर्षे
9. अज्ञात (स्त्री) – 50 वर्षे
10. अज्ञात (पु) – 8 वर्षे
11. जॉन इराना- 13 वर्ष
मालाड इमारत दुर्घटनेतील जखमी
मरी कुमारी रंगनाथ- वय वर्ष 30
धनलक्ष्मी बेबी- वय वर्ष 56 (प्रकृती स्थिर)
लीम शेख- वय वर्षे 49 (प्रकृती स्थिर )
रिजवाना सय्यद- वय वर्ष 33(प्रकृती स्थिर)
सूर्य मनी यादव- वय वर्षे 39 (प्रकृती स्थिर)
करीम खान वय वर्ष- 30 (प्रकृती स्थिर)
गुलजार अहमद अन्सारी- वय वर्ष 26 (प्रकृती स्थिर)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Kishori pedanekar, Mumbai, Mumbai Mayor