मुंबई, 12 जून: दोन दिवसांपूर्वी मुंबईतल्या मालाडमध्ये (malad building collapse) मुसळधार पावसामुळे चार मजली इमारतीचा भाग कोसळून 11 जणांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेवर मुंबई उच्च न्यायालयानं (Bombay High Court) तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. न्यायालयाचे ऐकले असते तर मालाड दुर्घटना घडली नसती, असे खडेबोल न्यायालयानं राज्य सरकार (State Government) आणि मुंबई पालिकेला (BMC) सुनावले आहेत.
मालाड दुर्घटना तसंच मोडकळीस आलेल्या इमारतींची न्यायालयीन चौकशी होणार आहे. या चौकशीसाठी न्यायमूर्ती जे.पी.देवधर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयानं देवधर यांची नियुक्ती केलीय. या दुर्घटनेप्रकरणी अनेक वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे.
राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेनं न्यायालयाच्या आदेशांना सपशेल दुर्लक्ष केलं आहे. भिवंडी दुर्घटनेनंतर न्यायालयानं सुमोटो याचिका दाखल केली होती. त्यावेळेस न्यायालयाने मोडकळीस आलेल्या इमारतींसंदर्भात आदेश जारी केले होते. मोडकळीस आलेल्या इमारतींबाबत योग्य ती खबरदारी घेण्याचं आदेश न्यायालयानं मुंबई पालिका आणि राज्य सरकारला दिले होते. आदेशांचे पालन केले नाही आता कारवाईला सामोरे जा, असं म्हणत न्यायालयानं संताप व्यक्त केला आहे.
हेही वाचा- पावसाचा कहर, जाणून घ्या ठाण्यातील पावसासंदर्भातले लेटेस्ट अपडेट्स
मालाड इमारत दुर्घटना
मुंबईत बुधवारी दिवसभर मुसळधार पाऊस झाला. त्यानंतर (Heavy rain in Mumbai) मुसळधार पावसामुळे मालाडमधील एका चार मजली चाळीचा (Residential structures) काही भाग कोसळल्याची दुर्घटना घडली होती. मालाडच्या मालवणी भागात ही घटना घडली. या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला असून 17 जण गंभीर जखमी झाले. (Malad Building Collapsed) या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील 6 मुलांसह 9 जणांचा करुण अंत झाला आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
मुंबईतील मालाड पूर्व या ठिकाणी मालवणी गेट क्र. 8 येथे अब्दुल हमीद मार्गावर न्यू कलेक्टर कंपाऊंड परिसरात ही दुर्घटना घडली. या ठिकाणी एका 3 मजली इमारतीचा दुसरा व तिसरा मजला बाजूला असलेल्या 1 मजली चाळीवर कोसळला. त्यामुळे मोठी दुर्घटना घडली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mumbai, Mumbai rain