जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / महाविकास आघाडीला इथंही धक्का; मुंबई बँकेत सत्तांतर, दरेकरांचा मार्ग मोकळा

महाविकास आघाडीला इथंही धक्का; मुंबई बँकेत सत्तांतर, दरेकरांचा मार्ग मोकळा

मुंबै बँक प्रकरणात Pravin Darekar यांच्याविरोधात गुन्हा दाखल Devendra Fadnavis यांनी केला गंभीर आरोप

मुंबै बँक प्रकरणात Pravin Darekar यांच्याविरोधात गुन्हा दाखल Devendra Fadnavis यांनी केला गंभीर आरोप

महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर मुंबई बँकेच्या अध्यक्षपदावरून दरेकर यांना पायउतार व्हावं लागलं होतं.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 4 ऑगस्ट : राज्यातील सत्तांतरानंतर आता मुंबई बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक उद्या पार पडणार आहे. मुंबई बॅंकेतही सत्तांतर होणार असून प्रविण दरेकर यांचं मुंबई बँकेच्या अध्यक्षपदी पुनरागमन होणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसणार आहे. महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर मुंबई बँकेच्या अध्यक्षपदावरून दरेकर यांना पायउतार व्हावं लागलं होतं. मात्र शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर आता पुन्हा दरेकरांना मुंबई बँकेच्या अध्यक्षपद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काय आहे प्रकरण? प्रवीण दरेकर यांची मुंबै बँकेवर संचालक म्हणून बिनविरोध निवड झाली होती. मुंबै बँकेच्या निवडणुकीत प्रवीण दरेकर मजूर आणि नागरी सहकार बँक अशा दोन्ही प्रवर्गातून निवडून आले होते. मात्र सहकार विभागाने प्रवीण दरेकर यांना मजूर म्हणून अपात्र ठरवलं. दरेकर 1997 पासून मुंबै बँकेवर मजूर प्रवर्गातून संचालक म्हणून निवडून येत आहेत. प्रविण दरेकर यांनी मुंबै बँक (Mumbai Bank) निवडणुकीसाठी मजूर संस्थे अंतर्गत अर्ज दाखल केला होता. यापूर्वीही दरेकर मजुर संस्थेचे प्रतिनिधी म्हणूनच मुंबै बँकेवर अध्यक्ष म्हणून निवडून आले होते. त्या प्रकरणी आम आदमी पक्षाने आक्षेप घेत पोलिसांत तक्रार केली होती. या प्रकरणी दोन महिन्यांपूर्वी आम आदमी पक्षाने तक्रार केली होती. माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाणे गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत होते. सहकार विभागाचे सह निबंधक बाजीराव शिंदे यांनी मजूर म्हणून प्रवीण दरेकर याना अपात्र घोषित केले. त्यानंतर त्यांचा जबाब ही पोलिसांनी नोंदवला तसेच सर्व कागदपत्रे सहकार विभागाने देऊनही पोलीस गुन्हा दाखल करत नव्हते. याबाबत आम आदमी पक्षाच्या वतीने आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे गुन्हा दाखल व्हावा म्हणून सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात