मुंबई, 23 जुलै: गेल्या काही दिवसांपासून रायगड (Raigad), रत्नागिरी (Ratnagiri), कोल्हापूर (Kolhapur), सांगली (Sangli), सातारा (Satara) परिसरात अतिमुसळधार पाऊस (Heavy to Heavy rainfall) पडत आहे. या अतिमुसळधार पावसामुळे रायगड, रत्नागिरी आणि कोल्हापुरात पूरस्थिती निर्माण झाली असून अनेक दुर्घटना घडत असल्याची माहिती समोर येत आहे. या संकटकाळात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना महत्त्वाचं आवाहन केलं आहे.
राज ठाकरेंनी म्हटलं, महाराष्ट्रात सर्वत्र पावसानं थैमान घातलं आहे. त्यातल्या त्यात कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही भागात भीषण पूर-परिस्थिती निर्माण झाली आहे. या अवघड परिस्थितीत मी सर्व महाराष्ट्र सैनिकांना त्यांना जितकं जमेल तितकी मदत त्यांनी पूरग्रस्तांना करावी असे आवाहन करतो.
राज ठाकरेंनी पुढे म्हटलं, आत्ता लोकांचा जीव महत्त्वाचा आहे आणि नंतर जसजसा पूर ओसरेल तसा रोगराईचा धोकाही वाढू शकेल. तुम्ही त्यात लक्ष घालून अत्यंत तातडीने योग्य ती मदत तिथे पोहोचेल असं पहावं. काम करताना अर्थातच स्वत:ची काळजीही घ्यावी. महाराष्ट्रावारचं मोठं संकट आहे. त्याला तोंड देताना आपल्याकडून कुठलीही कुचराई होता कामा नये.
महाडमध्ये दरड कोसळून 36 मृत्यू
महाडमध्ये मुसळधार पावसात मोठी दुर्घटना (big tragedy in mahad) घडली आहे. तळीये गावावर दरड कोसळली आहे. तब्बल 35 घरांवर ही दरड कोसळून 36 जणांचा मृत्यू (36 people died due to landslide) झाला आहे. अद्यापही काही नागरिक ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळाकडे बचावपथक दाखल झाले असून बचाव आणि शोधमोहिम मोठ्या वेगाने सुरू आहे. घटनास्थळी स्थानिक नागरिकांकडून आणि प्रशासनाकडून मदत कार्य सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.