CM उद्धव ठाकरेंच्या मोबाईल फोटोग्राफीवर नेटकरी झाले फिदा, तुम्ही पाहिलेत का?

CM उद्धव ठाकरेंच्या मोबाईल फोटोग्राफीवर नेटकरी झाले फिदा, तुम्ही पाहिलेत का?

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे फोटोग्राफी प्रेम जगजाहीर आहे. मात्र फार कमीवेळा उद्धव ठाकरे यांची मोबाईल फोटोग्राफी पाहायला मिळते.

  • Share this:

मुंबई, 27 डिसेंबर : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे फोटोग्राफी प्रेम जगजाहीर आहे. मात्र फार कमीवेळा उद्धव ठाकरे यांची मोबाईल फोटोग्राफी पाहायला मिळते. नुकतेच उद्धव ठाकरे यांनी आपल्या ऑफिशिअल इन्स्टाग्रामवर मोबाईलनं काढलेली दोन छायाचित्रे पोस्ट केली. हे फोटो पाहून नेटकरी उद्धव ठाकरेंच्या फोटोग्राफीवर फिदा झाले आहेत.

उद्धव ठाकरे यांना विमानातून केल्या जाणाऱ्या एरिअल फोटोग्राफीसाठी ओळखले जातात. याच फोटोचे 'महाराष्ट्र देशा' या नावाचे पुस्तक 2010 साली प्रकाशित झाले होते. त्यानंतर वारीचे दर्शन घडवणाऱ्या त्यांच्या 'पहावा विठ्ठल' या पुस्तकाचे प्रकाशन 2011 साली केले. मात्र सध्या उद्धव यांच्या इन्स्टाग्रामवरील फोटो सध्या व्हायरल होत आहेत.

उद्धव यांनी श्रीलंकेच्या नामशेष झालेल्या मच्छीमार ते कॅनडाच्या ध्रुवप्रवाहांपर्यंत सर्व काही आपल्या कॅमेरात टिपले आहे. यात नुकतेच उद्धव यांनी दोन फोटो पोस्ट केले. यातील एकात फुलणारी फुलं तर दुसर्‍या फोटोत सूर्य उगवताना दिसत आहे. शिवसेना अध्यक्ष आणि मुख्यमंत्री ठाकरे यांनी हे फोटो इन्स्टाग्रामवर, "आयफोन शॉट.", असे कॅप्शन लिहित शेअर केले. .

View this post on Instagram

iPhone shot

A post shared by @ uddhavthackeray on

या फोटोला आतापर्यंत 15 हजारहून अधिक लाईक्स मिळाल्या आहेत. बर्‍याच लोकांनी या फोटोचे कौतुक केले आहे. एका व्यक्तीने लिहिले, "आमचे मुख्यमंत्री खूप हुशार आहेत." दुसर्‍या युझरनं लिहिले, "सूर्योदयाचा सर्वात सुंदर फोटो, सुंदर दिवे, प्रतिबिंब”.

उद्धव ठाकरे यांच्या इन्स्टाग्राम फीडमध्ये असे अनेक सुंदर फोटो आहेत जे त्यांनी स्वत: क्लिक केले आहेत. इन्स्टाग्रामवर उद्धव यांचे 70 हजार फॉलोअर्स आहेत.

View this post on Instagram

Stilt Fishermen, Welligama

A post shared by @ uddhavthackeray on

दरम्यान, शिवसेनेने भाजपशी असलेले अनेक दशकांपूर्वीचे संबंध संपवल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

Tags:
First Published: Dec 27, 2019 02:38 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading