जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / महापरिनिर्वाण दिन : चैत्यभूमीवर उसळला भीमसागर, लाखो अनुयायींकडून बाबासाहेबांना वंदन

महापरिनिर्वाण दिन : चैत्यभूमीवर उसळला भीमसागर, लाखो अनुयायींकडून बाबासाहेबांना वंदन

महापरिनिर्वाण दिन : चैत्यभूमीवर उसळला भीमसागर, लाखो अनुयायींकडून बाबासाहेबांना वंदन

महापारिनिर्वाण दिनानिमत्त 1 डिसेंबरपासूनच चैत्यभूमीवर दर्शनासाठी येतात. चैत्यभूमी स्तूपात ठेवलेल्या आंबेडकरांच्या अस्थीकलश आणि प्रतिमेस हे अनुयायी अभिवादन करतात

  • -MIN READ Local18 Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 6 डिसेंबर :  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्ली येथे महापरिनिर्वाण झाले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 7 डिसेंबर 1956 रोजी मुंबईतील चैत्यभूमीवर त्यांच्यावर बौद्ध पद्धतीनं अंत्यसंस्कार करण्यात आले. बाबासाहेबांनी निधनापूर्वी 14 ऑक्टोबर 1956 रोजी लक्षावधी अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला होता. त्यांना बोधिसत्व असं म्हणतात. त्यामुळे बाबासाहेबांच्या पुण्यातिथीसाठी महापरिनिर्वाण दिन हा बौद्ध संकल्पनेतील शब्द वापरण्यात आला आहे. महापारिनिर्वाण दिनानिमत्त 1 डिसेंबरपासूनच चैत्यभूमीवर दर्शनासाठी येतात. चैत्यभूमी स्तूपात ठेवलेल्या आंबेडकरांच्या अस्थीकलश आणि प्रतिमेस हे अनुयायी अभिवादन करतात. यावर्षीही संपूर्ण जगभरातून बाबासाहेबांचे अनुयायी चैत्यभूमीवर अभिवादनासाठी आले आहेत. त्यांच्या आगमनाच्या निमित्तानं मुंबई महापालिका आणि प्रशासनानं जय्यत तयारी केलीय. कसे आहे स्मृतीस्थळ? चैत्यभूमीवर असलेल्या स्मृतीस्थळाचे फुलांनी सुशोभीकरण करण्यात येते. तसेच राजकारणी, उच्च पदावरील मान्यवर, संविधानिक पदावरील मान्यवर याठिकाणी येऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीना अभिवादन करतात. हे स्मृतीस्थळ एका एक लहान घुमटाच्या स्वरूपात आहे. हे दालन जमिनीवर आणि तळमजल्यात विभागले आहे. बाबासाहेबांचा एक निर्णय आणि मराठवाड्याची दूर झाली मोठी अडचण, पाहा Video चौरस आकाराच्या संरचनेत एक दीड मीटर उंचीची वर्तुळाकार भिंत आहे. वर्तुळामध्ये संगमरवरी फरशीवर डॉ. ​​बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धपुतळा आणि गौतम बुद्धाची मूर्ती आहे. वर्तुळाकार भिंतीत दोन दरवाजे आहेत. तळमजल्यावर एक स्तूप आहे आणि तेथे भिक्खूंसाठी विश्रांतीची जागा आहे. चैत्यभूमीचे मुख्य प्रवेशद्वार ही सांचीच्या स्तूपाच्या प्रवेशद्वाराची प्रतिकृती असून आतमध्ये अशोक स्तंभाची प्रतिकृती बनविली आहे. चैत्यभूमीचे उद्घाटन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची सून मीरा आंबेडकर यांनी 5 डिसेंबर 1971 रोजी केले होते. समतेचा पुतळा म्हणून या पुतळ्याला संबोधलं जातं.

    News18लोकमत
    News18लोकमत

    पालिकेकडून जय्यत तयारी महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त आशीष शर्मा यांच्या मार्गदर्शनानुसार महापरिनिर्वाण दिनानिमित्त तात्पुरता निवारा, शामियाना, व्ही.आय.पी. कक्ष, नियंत्रण कक्ष, रुग्णवाहिका, आरोग्य सेवा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छता, शौचालये, स्नानगृहे, बैठक व्यवस्थेसाठी बाकडे, विद्युत व्यवस्थेसह भ्रमणध्वनी चार्जिंग सुविधा इत्यादी सोयी - सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीत तात्पुरत्या निवा-याची सोय म्हणून सदर परिसरातील महानगरपालिकेच्या 6 शाळा निश्चित करण्यात आल्या आहेत. मुंबईतील एकमेव जपानी बुद्ध विहार, बाबासाहेब आंबेडकरांचाही होता संबंध, Video 6 डिसेंबर रोजी लवकर स्मृतीस्थळाचं दर्शन व्हावं यासाठी 5 तारखेपासूनच अनुयायी जमतात. एकत्र येऊन विविध भीमगीतं, सांस्कृतिक कार्यक्रम साजरे करतात आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जयजयकार करतात.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात