
सध्या कोरोना व्हायरसमुळे देशभरात 21 दिवसांचं लॉकडाउन आहे. त्यामुळे अनेकांना वैताग आलेला असला तरी आज मात्र मुंबईत चक्क मोर दिसल्यानं सर्वांनाच सुखद धक्का बसला.

नेहमीच माणसांनी गजबजलेली मुंबई सध्या शांत झाली आहे. सातत्यानं गजबजलेले रस्त्यांवर सध्या चिटपाखरूही नाही.

मुंबईमध्ये अशाप्रकारे मोठ्या संख्येनं मोर दिसण्याची ही पहिलीच वेळ आहे. सक्तीनं लावलेल्या या लॉकडाउननं आज मुंबईकरांना सुखद धक्का दिला.

मुंबईतील या शांततेचाच परिणाम म्हणून की काय सध्या मुंबईमध्ये सकळी पक्षांचे आवाज ऐकू येऊ लागले आहेत.




