यूपीएच्या काळातही मुंबईच्या 270 शेतकऱ्यांना कर्जमाफी !

यूपीएच्या काळातही मुंबईच्या 270 शेतकऱ्यांना कर्जमाफी !

युपीएच्या काळात मनमोहन सिंग पंतप्रधान असताना 2008साली जी कर्जमाफी झाली.त्यातही मुंबईतल्या तब्बल 270 शेतकऱ्यांनी कर्जमाफीचा लाभ उठवलाय यातला एक शेतकरी हा मुंबई उपनगरातील आहे तर उर्वरित 269 लाभार्थी हे मुंबई शहरातले आहेत.

  • Share this:

मुंबई, 6 जुलै : मुख्यमंत्र्यांसकट सध्या अनेकांना एकच प्रश्न सतावतोय. आणि तो म्हणजे मुंबईत शेतकरी आले कुठून ? कारण कर्जमाफीच्या लाभार्थीच्या यादीत चक्क मुंबईचाही समावेश आहे.

मुंबई शहरातल्या 694 तर मुंबई उपनगरातल्या 119 जणांना कृषी कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे.पण मुंबईतल्या या कथित शेतकऱ्यांनी कर्जमाफीचा लाभ उठवण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये युपीएच्या काळात मनमोहन सिंग पंतप्रधान असताना 2008साली जी कर्जमाफी झाली.त्यातही मुंबईतल्या तब्बल 270 शेतकऱ्यांनी कर्जमाफीचा लाभ उठवलाय यातला एक शेतकरी हा मुंबई उपनगरातील आहे तर उर्वरित 269 लाभार्थी हे मुंबई शहरातले आहेत. या मुंबईस्थित लाभार्थ्यांना एकूण 2.90 कोटींचं कर्ज माफ झालं होतं.ही वस्तुस्थिती फार कमी लोकांना ठाऊक आहे.

2009साली राज्य सरकारने केलेल्या कर्जमाफीच्यावेळीही एकट्या मुंबई जिल्ह्यात 287कोटींचं कृषी कर्ज माफ झाल्याचं आकडेवारी आजही सरकार दप्तरी उपलब्ध आहे. अर्थात मुंबईत राहून शेती करणारे हे कथित शेतकरी नेमके आहेत याचा सरकारी यंत्रणांनी कसून शोध घेतल्याचं मात्र, अजून कोणाच्या ऐकिवात नाही. म्हणूनच आताच्या युती सरकारने तरी मुंबईतल्या लाभार्थी शेतकऱ्यांची पडताळणी करूनच कर्जमाफीची अंमलबजावणी करण्याची मागणी होतेय.

First published: July 6, 2017, 1:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading