मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ, नव्या व्हायरसच्या मुकाबल्यासाठी राज्यातली आरोग्य यंत्रणा सज्ज

कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ, नव्या व्हायरसच्या मुकाबल्यासाठी राज्यातली आरोग्य यंत्रणा सज्ज

महाराष्ट्रात गेल्या महिनाभरापासून सातत्याने कोरोनाचा आलेख (Maharashtra Covid-19 graph) कमी होतोय. त्यामुळे सगळ्यांना दिलासा मिळाला आहे. राज्य सरकार आणि स्थानिका पालिकांनी मिळून जे सातत्याने काम केलं त्यामुळे हा आलेख घसरत असून त्याची 5 महत्त्वाची कारणं सांगितली जात आहेत.

महाराष्ट्रात गेल्या महिनाभरापासून सातत्याने कोरोनाचा आलेख (Maharashtra Covid-19 graph) कमी होतोय. त्यामुळे सगळ्यांना दिलासा मिळाला आहे. राज्य सरकार आणि स्थानिका पालिकांनी मिळून जे सातत्याने काम केलं त्यामुळे हा आलेख घसरत असून त्याची 5 महत्त्वाची कारणं सांगितली जात आहेत.

  • Published by:  Ajay Kautikwar
मुंबई 27 डिसेंबर: गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात दररोज नवीन आढळून येणाऱ्या रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या जास्त होती. मात्र रविवारी नव्या रुग्णांच्या संख्येत थोडी वाढ झाली आहे. दिवसभरात 3 हजार 314 रुग्णांची भर पडली आहे. ही संख्या अडीच ते तीन हजारांच्या आसपास बघायला मिळत होती. त्या संख्येने तीन हजारांचा टप्पा ओलांडला आहे. ही वाढ फार मोठी नसली तरी ती कायम राहते की पुन्हा घसरणीला लागते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. 2 हजार 124 जणांनी कोरोनावर मात केली. तर 66 जणांचा मृत्यू झाला. राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या ही 19 लाख 19 हजार 550 झालीय तर 18 लाख 9 हजार 948 जणांनी कोरोनावर मात केली. राज्याचा Recovery Rate चांगला असून तो 94.29वर गेला आहे. ब्रिटनमध्ये व्हायरस बदलल्याचं आढळून आल्याने महाराष्ट्र सरकारनेही आरोग्य यंत्रणेला सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. कोरोना टास्क फोर्स कामाला लागला आहे. कोरोनावरील विविध लशींच्या चाचण्या आता अंतिम टप्प्यात आल्या आहेत. लवकरच केंद्र सरकार लशीकरण अभियानाला सुरुवात करण्याची शक्यता आहे. याबाबत अधिक माहितीसाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी www.mohfw.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी. कोविड-19 (Covid-19) लस ही एकाचवेळी सर्वांना दिली जाणार का? लशींची सध्याची उपलब्धता बघता केंद्र सरकारने ज्या गटांना अधिक धोका आहे, अशा गटांची प्राधान्याने लशीकरणासाठी निवड केली आहे. यामध्ये आरोग्य कर्मचारी (Health workers) आणि फ्रंटलाईन वर्कर्सचा (Frontline Workers) समावेश आहे. त्यानंतरच्या दुसऱ्या टप्प्यात 50 वर्षांवरील व्यक्ती तसेच 50 पेक्षा कमी वयाच्या परंतु अन्य गंभीर आजार (comorbid) असणाऱ्या व्यक्तींना प्राधान्याने लस दिली जाणार आहे. कोरोना लस सर्वांनी घेणं बंधनकारक आहे का? कोविड-19 वरील लस घेणं ऐच्छिक असणार आहे. पण या रोगापासून स्वतःचं रक्षण करण्यासाठी वेळापत्रकानुसार कोरोनाचं लशीकरण करून घेणं आवश्यक आहे. कुटुंबातील सदस्य, मित्र, नातेवाईक आणि सहकारी तसंच संपर्कातील व्यक्तींमध्ये या रोगाचा प्रसार होऊ नये म्हणून लशीकरण करून घेण्याचा सल्ला सरकारनं दिला आहे. अल्पावधीत चाचणी करण्यात आलेली ही लस सुरक्षित आहे का? नियामक संस्थांनी लस सुरक्षित आणि कार्यक्षम आहे, असं स्पष्ट केल्यानंतर ती देशभरात वितरित केली जाणार आहे. सध्या कोरोनाग्रस्त (कन्फर्म किंवा संशयित) असलेल्या व्यक्तीला लस देता येते का? एखादी व्यक्ती कोरोनाग्रस्त असेल किंवा संशयित रुग्ण असेल तर अशा व्यक्तीमुळे लशीकरणाच्या ठिकाणी अन्य व्यक्तींना संसर्ग होण्याचा धोका आहे. या कारणामुळे संसर्गग्रस्त व्यक्तीमधील लक्षणे कमी झाल्यानंतर 14 दिवसांनी त्या व्यक्तीस लस दिली जाईल. कोरोनामुक्त व्यक्तीला लस घेणं आवश्यक आहे का? हो, कोरोना होऊन गेलेल्या व्यक्तीला वेळापत्रकानुसार लस घेणं गरजेचं आहे. कारण यामुळे त्या व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होईल. उपलब्ध लशींपैकी प्रशासन नेमकी लस कशी निवडणार? देशात लशीला परवाना देण्यापूर्वी क्लिनकल ट्रायल (Clinical trial) झालेल्या लशींची कार्यक्षमता आणि सुरक्षितता औषध नियमकांकडून तपासली जाते. त्यामुळे परवानाप्राप्त लशी या तुलनेने कार्यक्षम आणि सुरक्षित असतात.
First published:

पुढील बातम्या