देशातल्या सर्वाधिक घाणेरड्या १० रेल्वे स्थानकांत कल्याण तिसऱ्या क्रमांकावर तर...

देशातल्या सर्वाधिक घाणेरड्या १० रेल्वे स्थानकांत कल्याण तिसऱ्या क्रमांकावर तर...

देशातल्या सर्वाधिक अस्वच्छ १० रेल्वे स्थानकांची यादी नुकतीच जाहीर झाली आहे. यात कल्याण रेल्वे स्थानक देशात तिसऱ्या, तर ठाणे रेल्वे स्थानक देशात आठव्या स्थानावर आहे.

  • Share this:

मुंबई, 24 मे : देशातल्या सर्वाधिक अस्वच्छ १० रेल्वे स्थानकांची यादी नुकतीच जाहीर झाली आहे. यात कल्याण रेल्वे स्थानक देशात तिसऱ्या, तर ठाणे रेल्वे स्थानक देशात आठव्या स्थानावर आहे.

कुर्ल्याच्या लोकमान्य टिळक टर्मिनसचाही या यादीत समावेश असून ते पाचव्या स्थानावर आहे. देशातल्या रेल्वे स्थानकांची अवस्था जाणून घेण्यासाठी भारतीय रेल्वेच्या वतीनं दरवर्षी एक सर्वेक्षण केलं जातं, ज्यात प्रवाशांची रेल्वे स्थानकांबद्दल मतं जाणून घेतली जातात.

यंदा ११ मे ते १७ मे या कालावधीत हे सर्वेक्षण करण्यात आलं. कल्याणसोबतच कुर्ल्याचं लोकमान्य टिळक टर्मिनस पाचव्या, तर ठाणे रेल्वे स्थानक या यादीत आठव्या स्थानी आहे. या सर्वेक्षणात उत्तर प्रदेशातलं कानपूर रेल्वे स्थानक देशातलं सगळ्यात घाणेरडं रेल्वे स्थानक ठरलं. त्यानंतर बिहारचं पटना दुसरं, तर कल्याण हे तिसऱ्या क्रमांकाचं घाणेरडं स्थानक ठरलं.

दरम्यान कल्याण स्टेशन जर पाहिले तर 4,5,6 क्र. फलाटावर आणि ट्रक दरम्यान प्रचंड घाण पडलेली दिसते. भर उन्हात स्टेशनवर माज्या फिरताना दिसतात. ट्रॅकवर प्लास्टकी बॉटल खच दिसून येतो तर अन्नपदार्थ, मल पाडल्याचे दिसून येते. तर कल्याण स्थानकात रोज 800 गाड्या धावतात.

रोज तब्बल सुमारे 3000 प्लास्टिक बॉटल स्टेशन आणि ट्रक टाकल्या जातात अशी सूत्रांनी दिली आहे. त्यामुळं एकीकडे मोठा गाजावाजा करून बुलेट ट्रेनची पायाभरणी केली जात असली, तरी दुसरीकडे अस्तित्वात असलेली रेल्वेसेवा आणि रेल्वे स्थानकं किती घाणेरड्या अवस्थेत आहेत, हे यानिमित्तानं समोर आलं असून रेल्वेनं आता तरी सुधारावं, अशी अपेक्षा व्यक्त होतेय.

 

First published: May 24, 2018, 10:29 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading