पहिल्याच पावसात मुंबई गोवा महामार्गाच्या कामाची अशा पद्धतीने दैना उडाली आहे. यामुळे स्थानिक आणि वाहन चालकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येतेय.
कामथे घाट बंद करण्यात आला आहे. मात्र, तरीसुद्धा रस्त्यावरील भेगा वाढू लागल्यामुळे हा रस्ता खचतो की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार हा रस्ता करताना मोठ्या प्रमाणात मातीचा भराव टाकण्यात आला आणि त्यामुळे रस्त्याला तडा जात आहेत.