मुंबई, 11 जून: पावसाळा सुरू झाला की चाहूल लागते ती सण आणि उत्सवाची.... महाराष्ट्राचा (Maharashtra) महाउत्सव म्हणजे गणेशोत्सव (Ganeshotsav)... गेले दोन वर्षं कोविड निर्बंधामुळे मर्यादीत स्वरुपात गणेशभक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाचा उत्सव साजरा केला होता. आता कोविड निर्बंध हटवल्यामुळे यंदाच्या गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होणार आहे. गणेशभक्तांचं आराध्य दैवत बनलेल्या लालबागच्या राजाचा (Lalbaugcha Raja) आज पाऊल पूजन सोहळा पार पडला.
मुंबईतल्या गणेशोत्सवांची सुरुवातच लालबागच्या राजाच्या पाद्य पूजनानं होते. त्यामुळे यंदा ढोलताशांच्या गजरात मोठया दिमाखात लालबागच्या राजाचा उत्सव साजरा केला जाणार आहे.
गेल्या वर्षी साध्या पद्धतीनं पाद्यपूजन सोहळा
कोविडच्या निर्बंधांमुळे गेल्यावर्षी लालबागच्या राजाचा (lalbaugcha raja) पाद्यपूजन सोहळा आज पहाटे सहा वाजता पार पडला होता. कोविड 19 संसर्ग निर्बंधांमुळे अत्यंत साधेपणाने आणि सुरक्षितपणे हा पाद्यपूजन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. लालबागच्या राज्याच्या दर्शनाला होणारी गर्दी पाहाता लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने पाद्यपूजन सोहळा जाहीर न करता हा सोहळा केला होता.
हरियाणातही महाराष्ट्रासारखाच ड्रामा, एका मतानं कसे हरले Congress चे माकन
दोन वर्षांपूर्वी कोविडच्या(Corona Virus) संसर्गामुळे लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने "आरोग्य उत्सव" साजरा करून आदर्श निर्माण केला होता. त्यानंतर गेल्यावर्षी यंदा गणेश भक्तांच्या विनंती वरून लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचने नुसार गणेशोत्सव साजरा करणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यामुळे गेल्यावर्षीच्या गणेशोत्सवात आपल्या लाडक्या लालबागच्या राजाचं दर्शन भाविकांना घेता आलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.