Home /News /mumbai /

चिंता वाढवणारी बातमी! तिसऱ्या लाटेच्या तोंडावर मुंबईत रक्ताचा महातुटवडा; टाटा रुग्णालयाकडून 'हे' आवाहन

चिंता वाढवणारी बातमी! तिसऱ्या लाटेच्या तोंडावर मुंबईत रक्ताचा महातुटवडा; टाटा रुग्णालयाकडून 'हे' आवाहन

कोरोना काळात रक्तदान करणाऱ्यांची संख्या कमी झाल्यानं मुंबईत रक्ताचा प्रचंड तुटवडा (Blood shortage in mumbai) जाणवत असल्याची माहिती समोर आली आहे.

    मुंबई, 13 सप्टेंबर: कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेच्या तोंडावर मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. कोरोना काळात रक्तदान करणाऱ्यांची संख्या कमी झाल्यानं मुंबईत रक्ताचा प्रचंड तुटवडा (Blood shortage in mumbai) जाणवत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे कॅन्सर (Cancer) उपचारात अग्रगण्य असणाऱ्या टाटा मेमोरिअल सेंटरनं (TMC) नागरिकांना महत्त्वाचं आवाहन केलं आहे. त्यांनी दोन दिवसांपूर्वी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करत रक्तदात्यांना रक्तदान करण्याचं (Invites for blood donation) आवाहन केलं होतं. 'टाटा मेमोरिअल सेंटरमध्ये सध्या रक्ताचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. कृपया पुढे येऊन रक्तदान करा. रक्तदान करणं पूर्णपणे सुरक्षित असून तुम्ही एखाद्याचं प्राण वाचवू शकता.' अशा आशयाचं ट्विट टीएमसीकडून करण्यात आलं होतं. तसेच रक्तदान करण्यासाठी त्यांनी ब्लड बॅकेचा कॉन्टॅक्ट नंबरही (022-24177000) शेअर केला आहे. शिवाय हाऊसिंग सोसायटींना रक्तदान शिबीरे आयोजित करण्याचं आवाहनही केलं आहे. हेही वाचा-लस न घेतलेल्यांच्या मृत्यूचं प्रमाण दहापट अधिक, वाचा नव्या संशोधनातील ठळक बाबी टीएमसीचे संचालक डॉ सीएस प्रमेश यांनी सांगितलं की, 'टीएमसीकडून मुंबई, नवी मुंबई, वाराणसी, विशाखापट्टनम, गुवाहाटी, संगरूर आणि मुजफ्फरपूर येथे रुग्णालये चालवली जातात. यातील कोणत्याही ठिकाणी जाऊन रक्तदान करू शकतात. ते पुढे म्हणाले की, टीएमसी हॉस्पिटलला दररोज अंदाजे 60 युनिट रक्ताची गरज असते. पण ऐन कोरोना प्रादुर्भावाच्या काळात रक्तदानात 60% घट झाली होती. पण सध्या आमच्याकडे 25% रक्ताचा तुटवडा जाणवत आहे.” हेही वाचा-सावधान! महाराष्ट्रात गणेशोत्सवानंतर कोरोनाचा उद्रेक, आरोग्य अधिकाऱ्यांचा इशारा कोविड साथीच्या आधी मुंबईला दररोज 1,000 युनिट रक्ताची गरज होती. परंतु लॉकडाऊन दरम्यान कमी शस्त्रक्रियांमुळे यामध्ये घट झाली आहे. बीएमसी रुग्णालयातील एका डॉक्टरनं सांगितलं, "कोरोना विषाणूची दुसऱ्या लाटा ओसरत असल्यानं आता शस्त्रक्रिया आणि कर्करोगाच्या उपचाराची संख्या वाढत आहे. त्यामुळे रक्ताला अधिक मागणी वाढत आहे." मुंबई उपनगरातील एका रुग्णालयात काम करणाऱ्या आणखी एका डॉक्टरनं सांगितलं की, "अलीकडच्या काळातील मुंबईत सर्वात कमी रक्तसाठा उपलब्ध आहे." सध्या मुंबईत अनेक ठिकाणी रक्ताचा तुटवडा जाणवत आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Mumbai

    पुढील बातम्या