कोविंद यांच्या मुंबई दौऱ्यात 'मातोश्री भेट' नाही !

कोविंद यांचा राष्ट्रपतीपदाचा अर्ज भरतेवेळीही शिवसेनेचा कुणीच प्रतिनिधी तिथे उपस्थित नव्हता. त्याला प्रत्युत्तर म्हणूनच भाजपकडून कोविंद यांच्या मुंबई दौऱ्यात मातोश्री भेटीचा समावेश करण्यात आला नसल्याचं बोललं जातंय.

Chandrakant Funde | News18 Lokmat | Updated On: Jul 12, 2017 02:22 PM IST

कोविंद यांच्या मुंबई दौऱ्यात 'मातोश्री भेट' नाही !

मुंबई, 12जुलै : भाजपप्रणित एनडीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद हे येत्या 15 जुलैला मुंबई दौऱ्यावर येताहेत पण त्यांच्या कार्यक्रमापत्रिकेत 'मातोश्री भेटी'चा कुठेही उल्लेख नाही. त्यामुळे सेना-भाजपातले मतभेद पुन्हा चव्हाट्यावर आलेत. कोविंद यांचा राष्ट्रपतीपदाचा अर्ज भरतेवेळीही शिवसेनेचा कुणीच प्रतिनिधी तिथे उपस्थित नव्हता. त्याला प्रत्युत्तर म्हणूनच भाजपकडून कोविंद यांच्या मुंबई दौऱ्यात मातोश्री भेटीचा समावेश करण्यात आला नसल्याचं बोललं जातंय.

मुंबईत आल्यावर कोविंद विमानतळावरुन ते थेट मरीन ड्राईव्हच्या गरवारे क्लबमध्ये जातील. तिथे ते भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी आणि एनडीएमधील घटकपक्षांशी संवाद साधतील. त्याचा हा दौरा म्हणजे राष्ट्रपतीच्या निवडणूक प्रचाराचा भाग मानला जातोय. दरम्यान, कोविंद यांच्या मुंबई दौऱ्याबाबत शिवसेनेकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. राष्ट्रपतीपदासाठी मात्र, शिवसेनेनं यापूर्वीच रामनाथ कोविंद यांना पाठिंबा जाहिर केलेला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 12, 2017 02:22 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...