जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / चालत्या गाडीत चढताना अडकला 79 वर्षांचा प्रवासी, RPF जवानामुळे वाचला जीव

चालत्या गाडीत चढताना अडकला 79 वर्षांचा प्रवासी, RPF जवानामुळे वाचला जीव

चालत्या गाडीत चढताना अडकला 79 वर्षांचा प्रवासी, RPF जवानामुळे वाचला जीव

चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करताना प्लॅटफॉर्म आणि रुळाच्या मध्ये एक 79 वर्षांचा प्रवासी अडकला. कल्याण स्टेशनवर (Kalyan Station) 29 जानेवारीला ही घटना घडली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

कल्याण, 30 जानेवारी : चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करताना प्लॅटफॉर्म आणि रुळाच्या मध्ये एक 79 वर्षांचा प्रवासी अडकला. कल्याण स्टेशनवर (Kalyan Station) 29 जानेवारीला ही घटना घडली आहे. तिकडे उपस्थित असलेल्या एका आरपीएफ जवानामुळे या प्रवाशाचा जीव वाचला आहे. आपला जीव वाचविल्या बद्दल या प्रवाशाने आरपीएफ जवानांचे आभार मानले.

जाहिरात

शुक्रवारी दिल्ली ला जाणारी पंजाब मेल रात्री 8 वाजून 35 मिनिटांनी कल्याण रेल्वे स्थानकात चार नंबर प्लॅटफॉर्मवर आली. दिल्लीतील रहिवासी असलेल्या प्रवासी मासुर बफुर अहमद यांनी चालत्या गाडीत चढण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा पाय घसरल्याने ते फलाट आणि रेल्वेच्या मधील गॅपमध्ये पडले, यावेळी फलाटावर उपस्थित असलेल्या आरपीएफ जवान एस पी यादव आणि जितेंद्र गुजर यांनी तात्काळ धाव घेत मसूर यांना फलाटावर ओढून घेत त्यांचा जीव वाचवला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात