पालघर, 17 ऑगस्ट : तारापूर औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या नंडोलिया केमिकल्स या कंपनीमध्ये सायंकाळी भीषण स्फोट झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे. सायंकाळी सव्वासात वाजण्याच्या सुमारास हा स्फोट झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या स्फोटामुळे सालवड, पास्थळ, बोईसर, तारापूर आणि किनारपट्टीच्या सर्व गावांमध्ये मोठा कंप जाणवला. या स्फोटाचा आवाज पंधरा किलोमीटरवर असलेल्या पालघर शहरातदेखील प्रकर्षाने जाणवला.
तारापूर औद्योगिक वसाहतीमधील भीषण स्फोटाचा VIDEO pic.twitter.com/HqGiLxGVCX
— renuka dhaybar (@renu96dhaybar) August 17, 2020
रासायनिक प्रक्रियेदरम्यान हा औद्योगिक वसाहतीच्या टी झोनमध्ये स्फोट झाला असल्याची माहिती पुढे आली आहे. बोईसर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी प्रदीप कसबे घटनास्थळी पोहोचले असून पुढील बचावकार्य सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, गेल्या वर्षभरात मुंबईसह उपनगरांत स्फोट होऊन आगी लागण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. आजही मुंबईत प्रसिद्ध क्रॉफर्ड मार्केटमध्ये आग लागल्याची घटना समोर आली आहे.
अब्दुल रहमान स्ट्रीट वर ही आग लागल्याची माहिती आहे. तसंच या आगीमुळे काही दुकानांचं नुकसान झालं आहे.नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले गेले आणि काही वेळानंतर आग विझवण्यात यश आलं. सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Palghar, Palghar Police