मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /Accident at Morba Ghat : चालकाचे नियंत्रण सुटले, 200 फूट खड्यात कार झाडावर आदळली, मोरबा घाटात भयंकर अपघात

Accident at Morba Ghat : चालकाचे नियंत्रण सुटले, 200 फूट खड्यात कार झाडावर आदळली, मोरबा घाटात भयंकर अपघात

रायगड जिल्ह्यातील माणगाव दिघी हायवेवर मोरबा घाटात डोंगरोली गावच्या हद्दीत मोठा अपघात झाला आहे. श्रीवर्धनकडून मुंबईकडे अतिवेगाने कार जात होती

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Raigad, India

प्रमोद पाटील(पेण), 31 जानेवारी : रायगड जिल्ह्यातील माणगाव दिघी हायवेवर मोरबा घाटात डोंगरोली गावच्या हद्दीत मोठा अपघात झाला आहे. श्रीवर्धनकडून मुंबईकडे अतिवेगाने कार जात होती. दरम्यान चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी थेट रस्त्याच्या बाजूला खोल 200 फूट खड्ड्यात पलटी होऊन झाडावर आदळली. या कारमध्ये सहा प्रवासी प्रवास करीत होते. परंतु सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.

यातील काही प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहेत. घटनास्थळी साळुंके रेस्क्यू टीम दाखल होऊन माणगाव पोलीस घटनास्थळी  दाखल झाले आहेत. सदर कारमध्ये प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असल्याची माहिती आहे. या घटनेची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. हे सर्व प्रवाशी मुंबई येथील अंधेरी येथून असल्याचे समजते आहे.

First published:

Tags: Raigad, Raigad news, Raigad police