मुंबई 5 जुलै: राज्यात आजही उच्चांकी कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये 6 ते 7 हजार रुग्ण नव्याने आढळत आहेत. गेल्या 24 तासांमध्ये राज्यात 6555 रुग्ण आढळून आलेत. तर 151 जणांचा मृत्यू झाला. राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या 2,06,699 एवढी झाली आहे. तर मृत्यूचा आकडा 8822 वर गेला आहे. मुंबईतली एकूण रुग्ण संख्या 84524वर गेली आहे. तर आज राज्यात 3685 जणांना सुटी देण्यात आली. आज ठाणे महापालिका क्षेत्रात 373 कोरोणा पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे ठाणे महापालिका क्षेत्रात कोरोना बाधितांची संख्या एकूण 10731 झाली आहे. पुण्यात दिवसभरात 852 पाॅझिटिव्ह रुग्णांची वाढ. तर 420 रुग्णांना डिस्चार्ज देण्यातआला. पुण्यात आज 12 करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 410 रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. त्यात 70 जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. पुण्यात एकूण मृत्यूची संख्या 715 झाली आहे. दरम्यान, मिशन बिगीन अगेनमध्ये राज्यात आपण उद्योग व्यवसाय सुरू केले आहेत. महाराष्ट्रात पर्यटन व्यवसायांत हॉटेल उद्योगाचे मोठे स्थान आहे. हे लक्षात घेऊन हा उद्योग परत कसा सुरू करता येईल यासाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक कार्यपद्धती तयार केली असून ती लवकरच अंतिम झाल्यावर हॉटेल्स आणि रेस्टॉरंट सुरु करण्याचा विचार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. हिरेव्यापाऱ्याने वाढदिवसाला दिली जंगी पार्टी, दोनच दिवसांत झाला कोरोनाने मृत्यू ते आज राज्यातील हॉटेल्स असोसिएशनच्या पदाधिकारी यांच्यासमवेत व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये बोलत होते. यावेळी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, पर्यटन प्रधान सचिव वल्सा नायर सिंह सहभागी होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी हॉटेल व्यवस्थापनांनी आपल्या कामगार व कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करू नये असे सांगितले. मुख्यमंत्री म्हणाले की. मुंबई व शहरांतील सर्व हॉटेल्स या कोरोना युद्धात आमच्याबरोबर आहेत. त्यासाठी त्यांचे अभिनंदन. पर्यटन व्यवसायातील महत्वाचा उद्योग असलेली हॉटेल्स तसेच लॉजेस सुरू करण्यापूर्वी खूप काळजी घेऊन परवानगी द्यावी लागेल. कोरोनाचा नवा हॉटस्पॉट! एका पॉझिटिव्हमुळे 27 जणांना जडला संसर्ग आपली जबाबदारी दुहेरी आहे. हॉटेल्समध्ये येणारा प्रत्येक अभ्यागत, प्रवाशी निरोगी असेल यासाठी त्यांची वैद्यकीय तपासणी करावी लागेल कारण एक कोविड पॉझिटिव्ह व्यक्ती हॉटेलमध्ये आला तरी सर्व हॉटेल व कर्मचारी आजारी पडू शकतात. आत्ता आत्ता आपण सलूनला परवानगी दिली आहे ती सुद्धा फक्त केस कापणे व हेअर डायसाठी. जिम देखील बंदच ठेवले आहे कारण आपल्याला खूप काळजी घ्यावी लागणार आहे. संपादन - अजय कौटिकवार
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.