मुंबई 13 नोव्हेंबर: मुंबईतलं राजभवन (Raj Bhavan) दिवाळी निमित्त खास कंदीलांनी सजलं आहे. हे कंदिल आहेत पालघरच्या आदिवासी महिलांनी तयार केलेले बांबूचे आकाश कंदिल (bamboo made Akash Kandils prepared by tribal women). राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी यावर्षी राजभवनासाठी हे खास आकाश कंदिल मागवून घेतले आहेत. स्थानिक वस्तूंचा वापर करत आदिवासी महिलांची उत्पादनं प्रकाशात येण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतल्याचं राजभवानाने म्हटलं आहे. एवढच नाही तर राजभवनातल्या सर्व 200 कर्मचाऱ्यांना राज्यपालांनी हे आकाश कंदील आणि मिठाई भेट दिली.
दिवाळीच्या पहिल्याच दिवशी गुरुवारी राजभवानात खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. राजभवनातल्या अधिकाऱ्यांपासून ते स्वच्छता करणाऱ्या कर्मचाऱ्यांपर्यंत प्रत्येकाला मिठाई आणि हे बांबूचे कंदिल भेट देण्यात आले. राजभवनात अनेक राज्यपाल येतील आणि जातील. मात्र इथले कर्मचारी हे कायमचे असतात आणि त्यांच्याच कामांमुळे या राजभवनाचं सौंदर्य कायम आहे असं राज्यपाल यावेळी बोलताना म्हणाले.
Vocal for Local: Governor Bhagat Singh Koshyari presented the bamboo Sky Lamps prepared by tribal women to the staff of Raj Bhavan. pic.twitter.com/ozWQ3SeMwB
— Governor of Maharashtra (@maha_governor) November 12, 2020
फेब्रुवारी महिन्यात राज्यपालांनी पालघर जवळच्या विवेक ग्रामीण विकास केंद्राला भेट दिली होती. त्यावेळी ते इथे आदिवासी महिला तयार करत असलेल्या बांबूच्या विविध वस्तूंनी प्रभावित झाले होते.
त्यानंतर त्यांनी या महिलांना प्रोत्साहन मिळावं आणि त्यांची कला सर्वदूर पोहोचावी यासाठी हे कंदिल राजभवनासाठी खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Diwali 2020