हे ही वाचा-आबांची जादू आजही; आर.आर पाटील यांचं नाव घेतलं आणि 40 कोटी जास्त मिळाले काय आहे एसएमए टाइप 1 आजार हा आजार जेनेटीक डिसिज म्हणजे, जनुकीय बदलांमुळे होणारा आजार आहे. शरीराचे स्नायू अत्यंत कमकूवत होतात. पहिल्यांदा हात, पाय आणि त्यानंतर फुप्फुसांच्या स्नायूंची शक्ती कमी होते. रुग्ण रेस्पिरेटरी पॅरलेसिसमध्ये जातो. तज्ज्ञांच्या मते हा आजार दिवसेंदिवस वाढत जाणारा आहे. या आजारातून बचाव होऊ शकतो, असं डॉक्टरांकडून सांगण्यात आलं होतं. मात्र यासाठी अमेरिकेतील महागड्या 16 कोटींच्या इंजेक्शनची गरज असते. तीराच्या आजाराबद्दल कळताच तिच्या पालकांनी लोकांना मदतीचं आवाहन केलं. चिमुकल्या तीराला वाचविण्यासाठी अख्खा देश एकत्र आला व त्यांनी 16 कोटी रुपयांचं इंजेक्शन खरेदी केलं. दरम्यान हे औषध भारतात आणण्यासाठी 6 कोटींचा टॅक्सही लागणार होता. मात्र राज्य सरकार व काही राजकीय नेत्यांच्या मदतीने हा टॅक्सही रद्द करण्यात आला व तीराला नवसंजीवनी मिळाली.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: India america, Maharashtra, Mumbai, Teera kamat, Teera prakriti