जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / CBI कडून समीर वानखेडेंची मॅरेथॉन चौकशी; 15 प्रश्नांची यादी समोर, शाहरुखबाबत..

CBI कडून समीर वानखेडेंची मॅरेथॉन चौकशी; 15 प्रश्नांची यादी समोर, शाहरुखबाबत..

समीर वानखेडेंची मॅरेथॉन चौकशी

समीर वानखेडेंची मॅरेथॉन चौकशी

Sameer Wankhede Appears Before CBI: आर्यन खान ड्रग प्रकरणी 25 कोटी रुपयांच्या कथित लाच मागितल्याप्रकरणी एनसीबी मुंबईचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांची सीबीआय चौकशी सुरू आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

nkhedeमुंबई, 20 मे : आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात 25 कोटी रुपयांची मागणी करण्यात आल्याचा आरोप असलेल्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे माजी मुंबई झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांची आजची चौकशी संपली आहे. तब्बल पाच तासांच्या सीबीआय चौकशीनंतर उद्या पुन्हा त्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. या प्रकरणी वानखेडेंच्या चौकशीची ही पहिली फेरी असून त्यांना अनेक प्रश्न विचारले जाणार असल्याचे सीबीआयच्या सूत्रांनी सांगितले. एक दिवसापूर्वी, मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला वानखेडेंवर 22 मे पर्यंत कोणतीही जबरदस्ती कारवाई करू नये असे निर्देश दिले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीबीआयने समीर वानखेडे यांना 15 प्रश्न विचारलेले आहेत. समीर वानखेडे यांच्या चौकशीसाठी दिल्लीतून देखील सीबीआयची टीम दाखल झाली आहे. वानखेडेंची प्रॉपर्टी, महागड्या गाड्या आणि परदेश वाऱ्यांवरील खर्च यावर त्यांना प्रश्न विचारण्यात आल्याची माहिती आहे. आर्यन खान केसमधील वादग्रस्त घडामोडी, 50 लाख रुपये कथितरित्या स्वीकारल्याचा आरोप, ज्ञानेश्वर सिंह यांच्याशी वादग्रस्त संवाद आणि खुद्द NCBच्या SITनं सादर केलेला अहवाल या सगळ्यांवरून वानखेडेंवर प्रश्नांची सरबत्ती करण्यात येतेय. आर्यन खानला सोडवण्यासाठी शाहरुख खानकडे 25 कोटी रुपये मागितल्याचा वानखेडे यांच्यावर आरोप आहे. समीर वानखेडे यांना विचारलेले 15 प्रश्न कोणते?

  • तुम्ही शाहरुख खानशी कॉलवर किती वेळा बोललात?
  • तुम्ही शाहरुख खानला भेटलात का आणि असल्यास किती वेळा?
  • शाहरुख खानला मदत करण्याबद्दल कसे बोलत होतास?
  • शाहरुख कोणत्या मदतीसाठी मेसेजमध्ये तुमचे आभार मानत होता?
  • 18 कोटींच्या डीलबद्दल तुमच्याकडे काय माहिती होती?
  • आर्यन खानला का अटक करण्यात आली?
  • अटकेनंतर शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीशी तुम्ही किती वेळा बोलले?
  • तुम्ही अवघ्या काही महिन्यांत 7 वेळा परदेश प्रवास केला, हा प्रवास कोणाच्या खर्चाने गेला होता?
  • तुमची मालमत्ता तुमच्या पगारापेक्षा जास्त आहे का? या मालमत्तांसाठी पैसा कुठून आला?
  • तुमच्याकडे लाखो किमतीची घड्याळे आहेत, ती कुठून आणली?
News18लोकमत
News18लोकमत
  • 50 लाखांपैकी 12 लाख रुपये दिल्याचा आरोप आहे, यावर काय म्हणणं आहे?
  • किरण गोसावी आणि प्रभाकर साईल हे 50 लाख घेण्यासाठी गेले होते, तेव्हा तुमच्याशी फोनवर संभाषण झाल्याचा आरोप आहे, यावर काय म्हणणं आहे?
  • 27 जणांच्या यादीत केवळ 10 जणांना अटक करण्यात आली. बाकीच्यांना सोडण्याच्या बदल्यात पैसे घेतल्याचा तुमच्यावर आरोप आहे. यावर काय बोलणार?
News18लोकमत
News18लोकमत
  • आर्यन खानच्या अटकेनंतर पूजा ददलानीसोबत झालेल्या पैशाच्या व्यवहारामागे तुमचा हात असल्याचा आरोप आहे. यावर काय म्हणणं आहे?
  • तुमच्या सूचनेवर किरण गोसावी यांनी डील केली. या आरोपावर काय म्हणणं आहे?
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात