दक्षिण मुंबईतल्या या भागात संध्याकाळी अतिशय गर्दी असते. महत्त्वाची ऑफिसेस या भागात असल्याने सगळ्यांची गर्दी ही सीएसटी स्टेशनकडे असते.
मेट्रोचं कामही या भागात सुरू असल्याने वाहतूकीला अडथळा निर्माण होत असतो. या पुलावर जे लोक चालत होते ते सर्व जण खाली कोसळले.
जखमींना जेजे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. अग्निशमन दल आणि पोलिस घटनास्थळी पोहोचले असून मदत कार्य सुरू केलं आहे.
या दुर्घटनेत अनेक जण जखमी झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. माहिती समोर आली आहे. टाईम्स ऑफ इंडियासमोरील हा पूल कोसळला.
घटना घडली तेव्हा वाहतूकही सुरू होती. पुलाच्या जवळच बेस्ट ची ड्रायव्हरने थांबविल्याने मोठी दुर्घटना टळली.