जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / ...आणि पुलावरचे लोक खाली कोसळले

...आणि पुलावरचे लोक खाली कोसळले

...आणि  पुलावरचे लोक खाली कोसळले

जखमींना जेजे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

    मुंबई 14 मार्च : दक्षिण मुंबईतल्या या भागात संध्याकाळी अतिशय गर्दी असते. महत्त्वाची ऑफिसेस या भागात असल्याने सगळ्यांची गर्दी ही सीएसटी स्टेशनकडे असते. हा पूल कोसळल्यामुळे प्रचंड धावपळ उडाली. पुलाखाली काही गाड्याही दबल्या गेल्या आहेत. मेट्रोचं कामही या भागात सुरू असल्याने वाहतूकीला अडथळा निर्माण होत असतो. या पुलावर जे लोक चालत होते ते सर्व जण खाली कोसळले. जखमींना जेजे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. अग्निशमन दल आणि पोलिस घटनास्थळी पोहोचले असून मदत कार्य सुरू केलं आहे. या दुर्घटनेत 5 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. टाईम्स आॅफ इंडियासमोरील हा पूल कोसळला. संध्याकाळच्या सुमारासही घटना घडली आहे. संध्याकाळी ऐनगर्दीच्या वेळी ही दुर्घटना घडली. जखमींना जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात