मुंबई, 13 जुलै : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक झाली. अंतिम वर्ष विद्यार्थ्यांच्या परीक्षेबाबत (Final Year Exam) झालेल्या या बैठकीत परीक्षा घेऊ नये ही भूमिका कायम ठेवण्यात आली असल्याची माहिती उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.
'परीक्षा घेऊ नये ही भूमिका आपत्ती व्यवस्थापन समितीने कायम ठेवली. आजची कोविडची परिस्थिती पाहता परीक्षा घेणं शक्य नाही. अनेक महाविद्यालयात क्वारन्टाइन सेंटर करण्यात आले आहेत. मागच्या परिस्थिती पेक्षा आताची कोविड संसर्गाची परिस्थिती गंभीर आहे,' असं स्पष्टीकरण उदय सामंत यांनी दिलं आहे.
काय म्हणाले उदय सामंत?
- एटीकेटी बाबत सर्व कुलगुरूंनी सकारात्मक निर्णय घेतला
- बंगळुरूमध्ये 50 जणांची पारीक्षा घेतली यात निम्म्या विद्यार्थ्यांना कोविडची बाधा झाली
- मग हजारो विद्यार्थ्यांची जबादारी कोण घेणार
- वाईन शॉप आणि विद्यार्थी यांची तुलना करू नका
- पालक आणि विद्यार्थी या सर्वांनी या परीक्षेला विरोध केला
- सरकारला कुठला इगो नाही
- 12 हजार कंटेन्मेंट झोन, या मध्ये 1 कोटी लोक आहेत, मग येथील विद्यार्थ्यांची परीक्षा कशी घेणार?
- विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळू नका
दरम्यान, विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) अंतिम वर्षाच्या परीक्षा सप्टेंबर अखेरपर्यंत घेण्याचा आदेश काढला आहे. मात्र, युजीसीने दिलेल्या निर्णयानुसार महाराष्ट्रात सप्टेंबरपर्यंत परीक्षा घेणं अशक्य असल्याचं राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी याआधीच पत्रकार परिषदेतून सांगितलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.