Home /News /mumbai /

राज्यपाल म्हणाले, महाराष्ट्रात राहाताय ना? मग मराठी आलीच पाहिजे

राज्यपाल म्हणाले, महाराष्ट्रात राहाताय ना? मग मराठी आलीच पाहिजे

वाशी येथे कोश्यारी यांच्या हस्ते ‘उत्तराखंड भवन’चे लोकार्पण करण्यात आले

    नवी मुंबई, 16 जानेवारी : महाराष्ट्रात राहताय ना? मग मराठी यायला हवं. नसेल येत तर शिका, असं आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं आहे. महाराष्ट्र व उत्तराखंडमध्ये मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक आदानप्रदान केलं जातं. तर या दोन्ही राज्यांमधील भाषांमध्येही बरंच साम्य आहे. मराठी बोलणं अवघड नसल्याने महाराष्ट्रात वास्तव्यास असलेले आणि ज्यांना मराठी बोलता येत नाही, अशांनी ती शिकून घ्या; असं आवाहन कोश्यारी यांनी केलं आहे. वाशी येथे कोश्यारी यांच्या हस्ते ‘उत्तराखंड भवन’चे लोकार्पण करण्यात आले. यावेळी त्यांनी मराठीचं महत्त्व विशद केलं. या कार्यक्रमाला उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत, उत्तराखंड राज्याच्या आदिवासी मंत्री रेखा त्यागी, महापौर जयवंत सुतार, आमदार गणेश नाईक याबरोबरच उत्तराखंडमधील मूळ निवासी व मुंबईत कार्यरत असलेले अधिकारी उपस्थित होते. आपल्या देशाची भाषावार प्रांतरचना करण्यात आल्यानंतर त्या त्या राज्यांमध्ये भाषा अधिक संपन्न व समृद्ध व्हावी हा प्रयत्न होता. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. येथे रोजगाराच्या संधी अनेक असल्याने विविध राज्यांमधील तरुण करिअर घडविण्यासाठी  मुंबईची वाट धरतात. तर दुसरीकडे पुण्यातही विविध राज्यांतील, देशांतील तरुण शिक्षणासाठी येतात. अशावेळी संवाद सुकर होण्यासाठी भाषा शिकणं गरजेचं आहे. महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव वाढविण्यासाठी पुढाकार उत्तराखंडप्रमाणे महाराष्ट्रातील सांस्कृतिक वैभव वाढविण्यासाठी पुढाकार घेण्यात येणार आहे. यासंदर्भात राज्य सरकारशी चर्चा करणार असल्याचे कोश्यारी यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश प्रगतीपथावर असून मोदी ग्रामीण भागाच्या विकासासाठी पुढाकार घेत असल्याचेही कोश्यारी यावेळी म्हणाले.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    पुढील बातम्या