धक्कादायक म्हणजे हिरेन यांच्या मारेकऱ्यांना या दोघांनीही मोठी रक्कम दिल्याचा दावाही एनआयएनं केला आहे. दरम्यान प्रदीप शर्मांच्या वकिलांनी एनआयएनं कोर्टात केलेले सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. प्रदीप शर्मा यांच्या घरातून काही महत्वाचे कागद पत्र मिळाले आहे. मनीष वसंत सोनी आणि सतीश यांना देखील अटक करण्यात आली आहे. NIA नी कोर्टात प्रदीप शर्मा यांची 14 दिवसाची कोठडीची मागणी केली होती. मात्र कोर्टानं 11 दिवसांची NIA कोठडी सुनावली आहे. एनआयएने प्रदीप शर्मा यांच्या घरी छापे टाकले होते. सकाळी 6.30 च्या सुमारास शर्मा यांच्या अंधेरीतील घरी ही कारवाई करण्यात आले. प्रदीप शर्मा यांना एनआयएनं लोणावळ्यातून ताब्यात घेतलं होतं आणि त्यांची चौकशी सुरू होती अखेर चौकशी अंती दुपारी प्रदीप शर्मांना अटक करण्यात आली. हेही वाचा- चिंताजनक! महाराष्ट्राला तिसऱ्या लाटेत डेल्टा प्लस व्हेरिएंटचा अधिक धोका मनसुख हिरेन आणि कार मायकल रोड प्रकरणी प्रदीप शर्मा यांची चौकशी झाली होती. पण, एनआयएच्या ते कायम रडारवर होते. दोन दिवसांपूर्वीच NIA ने संतोष आणि आनंद या दोघांना अटक केली होती.एकाला लातूरमधून अटक केली आहे. दोघांना न्यायालयात हजर केले असता 21 जूनपर्यंत NIA कोठडी सुनावली आहे. त्यांच्या चौकशीतून काही नवीन खुलासे झाले आहेत. त्यानंतर एनआयएच्या कारवाईला वेग आला आणि त्यानंतर प्रदीप शर्मा यांना अटक करण्यात आली.#UPDATE | Special NIA court in Mumbai sends former 'encounter specialist' of Mumbai Police Pradeep Sharma and two other accused to police custody till June 28, in connection with Mansukh Hiren death case
— ANI (@ANI) June 17, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Hiren mansukh, Nia