Home /News /mumbai /

मंत्रालयात त्रिमूर्ती पुतळ्याच्या मागे आढळल्या दारूच्या रिकाम्या बाटल्या, कडेकोट सुरक्षा असतानाही बाटल्या येतात कशा?

मंत्रालयात त्रिमूर्ती पुतळ्याच्या मागे आढळल्या दारूच्या रिकाम्या बाटल्या, कडेकोट सुरक्षा असतानाही बाटल्या येतात कशा?

मंत्रालयात (Mantralaya) पुन्हा दारूच्या रिकाम्या बाटल्या (Liquor Bottles) आढळून आल्या आहेत. बघा व्हिडिओ.

मुंबई, 10 ऑगस्ट: मंत्रालयात पुन्हा दारूच्या रिकाम्या बाटल्या आढळून आल्या आहेत. त्रिमूर्ती पुतळ्याच्या मागे या रिकाम्या बाटल्या आढळून आल्याचं समजतंय. या भागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी या बाटल्या आणल्या का हा प्रश्न उपस्थित होतोय. यापूर्वी देखील माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कार्यालयाबाहेर बसण्यासाठी असलेल्या वारहंड्यात रिकाम्या बाटल्या आढळून आल्याचं NEWS18 लोकमतने उघडकीस आणलं होतं. त्यामुळे आता प्रश्न उपस्थित होतो की मंत्रालयात कडेकोट सुरक्षा तपासणी होत असताना या बाटल्या येतात कशा ? मुंबईतल्या मंत्रालयात राज्याचा गाडा हाकला जातो. मंत्रालयात प्रवेश करण्यासाठी तपासणी केली जाते. पासशिवाय मंत्रालयात प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे मंत्रालयात चक्क दारुच्या बाटल्यांचा खच कसा आला? असा सवाल उपस्थित होत आहे.

तुमच्या शहरातून (मुंबई)

Published by:Pooja Vichare
First published:

Tags: Crime news, Mumbai

पुढील बातम्या