कोराना काळात रेल्वेनं प्रवास करताय? धोका टाळण्यासाठी पाळा 'हे' नियम

कितीही काळासाठी प्रवास करत असलात, तरीही रेल्वमध्ये उभं राहताना किंवा बसताना इतरांपासून 6 फुटांचं अंतर ठेवा. अन्यथा कोरोना होण्याचा धोका वाढू शकतो.

कितीही काळासाठी प्रवास करत असलात, तरीही रेल्वमध्ये उभं राहताना किंवा बसताना इतरांपासून 6 फुटांचं अंतर ठेवा. अन्यथा कोरोना होण्याचा धोका वाढू शकतो.

  • Share this:
    मुंबई, 2 नोव्हेंबर : अनलॉकमध्ये आता अनेक गोष्टी सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र रेल्वे सर्वांसाठीच अद्यापही सुरू करण्यात आलेली नाही. या काळात प्रवासादरम्यान, कोविड-19 आजाराची लागण होण्याचा धोका वाढतो, असं सीडीसीसह सर्वच आरोग्य संस्थांनी सांगितलंय. त्यामुळे रेल्वेनी प्रवास करणार असाल, तर आरोग्य यंत्रणेनी सांगितलेल्या सूचनांचं पालन करायलाच हवं. सुरुवातीला अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, कोरोना योद्ध्यांव्यतिरिक्त इतरांना लोकलने प्रवास करायला परवानगी नव्हती. पण हळूहळू अनलॉकमध्ये सरकारी कर्मचारी, महिलांना लोकलमधून प्रवास करायला परवानगी देण्यात आली आहे. या प्रवासातही कोरोनासंबंधीची सर्व काळजी घेणं बंधनकारक आहे. तुम्ही जर नोकरीसाठी किंवा सणासुदीनिमित्त गावी रेल्वेनी जाणार असाल, तर तुम्हाला हे नियम माहीत असणं आणि ते पाळणं गरजेचं आहे. प्रत्येक प्रवाशाने ही काळजी घ्यायलाच हवी कितीही काळासाठी प्रवास करत असलात, तरीही रेल्वमध्ये उभं राहताना किंवा बसताना इतरांपासून 6 फुटांचं अंतर ठेवा. अन्यथा कोरोना होण्याचा धोका वाढू शकतो. कल्याणमधील फोर्टिस हॉस्पिटलमधील चीफ इंटेसिव्हिस्ट डॉ. संदीप पाटील यांनी, रेल्वे प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. प्रवासाची पूर्वतयारी - जागरुक रहा : रेल्वेचं वेळापत्रक माहिती करून घ्या, जेणेकरून कमी गर्दीच्या वेळात तुमच्या सोयीनुसार तुम्ही प्रवास करू शकाल. तुमचा पास/ तिकीट आधीच काढा : शक्य असेल तर ई-पास किंवा ई-तिकीट आधीच काढा म्हणजे तिकिटाच्या रांगेत उभं रहावं लागणार नाही. शक्यतो स्पर्शविरहित पद्धतीने तिकिट काढा. प्रवासातील गरजांचा आधीच विचार करा : तीन स्तरांचा फेस मास्क, हँड सॅनिटायझर आणि डिसइन्फेक्टंट वाइप्स सोबत ठेवा. एका बंद पिशवीत काही जादाचे मास्क सोबत ठेवा. जर एखादं मास्क खराब झालं, तर दुसरं वापरू शकाल. तयारी करा : कामावर निघण्याआधी साबण आणि पाण्याने हात स्वच्छ धुवा आणि मग तुमचा मास्क घाला. मास्क घातल्यावर तुमच्या कामाच्या ठिकाणी पोहोचेपर्यंत त्याला हात लावू नका किंवा काढू नका. घरातून बाहेर पडण्याआधी हातमोजे घाला, त्यामुळे जरी तुम्ही दारांची हँडल आणि रेलिंगला हात लावलात तरीही सुरक्षित राहाल. ऑफिसात पोहोचल्यावर त्या हातमोज्यांची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावा. जर हातमोजे घातले नसतील. तर संपूर्ण प्रवासात तोंडाला हात लावू नका आणि ऑफिसात पोहोचल्यावर हात स्वच्छ धुवा. प्रवासात घ्या ही काळजी - पृष्ठभागांना शिवू नका : तिकिट मशीन, हँड रेलिंग, एलिव्हेटरमधील बटणं आणि रेल्वे स्थानकांवरील बेंचना जाणीवपूर्वक हात लावू नका. जर चुकून अशा पृष्ठभागांना तुमचा हात लागला तर तातडीने साबण आणि पाण्याने हात धुवा किंवा 60 टक्के अल्कोहोल असलेला सॅनिटायझर वापरा. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळा : इतर प्रवाशांपासून साधारणपणे 6 फुटांचं अंतर ठेवा. गटानी एकत्र थांबू नका. बेंचवर बसताना आपल्या दोन्ही बाजूंना एक-एक सीट मोकळं सोडायला विसरू नका. रेल्वेत बसणं, उभं राहणं, रांग आणि बाहेर पडण्यासंबंधी केलेल्या खुणा पाळा. रेल्वे स्थानाकांवरील सार्वजनिक स्वच्छतागृह वापरताना : सार्वजनिक स्वच्छतागृहांचा वापर केल्यानंतर 20 सेकंदांसाठी हात स्वच्छ धुवा. रेल्वे स्थानकांवर खाद्य पदार्थ आणि पाणी विकत घेताना : तुमचे स्वत:चे खाद्य पदार्थ आणि पाण्याची बाटली सोबत बाळगा आणि सहप्रवशांना काही देऊ किंवा त्यांच्याकडून काही घेऊ नका. जर रेल्वेकडून खाद्यपदार्थ किंवा पाण्याची बाटली घ्यावी लागलीच, तर डिजिटल पेमेंट करा किंवा अचूक सुटे पैसे द्या. प्रवासात खाण्यासाठी किंवा पाणी पिण्यासाठी मास्क काढण्याऐवजी ऑफिसात पोहोचेपर्यंत दम धरा आणि तिथं गेल्यावर खा किंवा प्या. जर खाण्या-पिण्यासाठी मास्क काढलातच तर तो डिसइन्फेक्टेड पृष्ठभागावर ठेवाल याची काळजी घ्या. थुंकू नका : यावर कठोर बंदी आहे कुठेही थुंकू नका. इच्छितस्थळी किंवा ऑफिसात पोहोचल्यावर हे करा - हाताची स्वच्छता : प्रवास पूर्ण झाल्यावर इच्छितस्थळी किंवा ऑफिसात पोहोचल्यावर हात साबण आणि पाण्याने 20 सेकंदांपर्यंत धुवा. मास्कची स्वच्छता : प्रवासातला मास्क बदला आणि नवा वापरा. वापरलेला मास्क एका पिशवीत बंद करून ठेवा मग नंतर धुवा किंवा टाकून द्या. कॅफेटेरियात गर्दी करू नका : ऑफिसात एकत्र जेवू नका आणि कॅफेटेरियातही सुरक्षित अंतर ठेवा. इतर माध्यमांतून तुम्ही प्रवास केलात तर तुम्हाला कोविड-19 होण्याचा धोका अधिक आहे. पण जर स्वच्छतेचे सरकारने सांगितलेले सगळे नियम पाळलेत तर प्रवास सुखकर होईल. आजारी असाल, कोविड होऊन गेलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आला असाल किंवा तुमची कोविड चाचणी केली आहे आणि निकाल यायचा आहे, तर घरीच रहा किंवा अशा मार्गांनी प्रवास करा जेणेकरून इतरांशी कमीत-कमी संपर्क येईल. दरम्यान, मुंबईकरांना सरसकट लोकल सुरू करण्यासंदर्भात राज्य सरकारने पश्चिम आणि मध्य रेल्वेला पत्र पाठवलं होतं. या पत्राला रेल्वे प्रशासनाकडून उत्तर आलं आहे. लोकल सुरू झाल्यावर गर्दीचं नियोजन कसं करणार, अशी विचारणा पत्राद्वारे रेल्वे विभागाने राज्य सरकारला केली आहे. शिवाय लोकल सुरू करण्यासंदर्भात राज्य सरकार आणि रेल्वे यांची संयुक्त बैठक लवकर व्हावी, यात गर्दीचं नियोजन करण्याच्या संदर्भात व्यवहार्य मार्ग काढावा, असं पत्रात म्हटलं आहे. सध्या मुंबई लोकल महिला, वकिल आणि सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आहे
    Published by:Karishma Bhurke
    First published: