Home /News /mumbai /

स्फोटग्रस्तांच्या हातावर तुरी, मुख्यमंत्री थापाडे - राज ठाकरे

स्फोटग्रस्तांच्या हातावर तुरी, मुख्यमंत्री थापाडे - राज ठाकरे

डोंबिवलीतल्या प्रोबेस कंपनीतल्या स्फोटांमध्ये नुकसान झालेल्यांनी घेतली राज ठाकरेंची भेट

30 एप्रिल : गेल्या वर्षी डोंबिवलीत प्रोबेस कंपनीत स्फोट झाला होता. यामध्ये अनेक घरांचं नुकसान झालं होतं. पण 11 वर्ष उलटूनही या घरमालकांना नुकसान भरपाई मिळालेली नाही. या पार्श्वभूमीवर नुकसान झालेल्या नागरिकांनी रविवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री थापाडे असल्याचे बोलून दुर्घटनाग्रस्तांच्या हातावर तुरी देणाऱ्या राज्य सरकारला टोला लगावला. डोंबिवलीच्या औद्योगिक विभागातील प्रोबेस कंपनीत गेल्यावर्षी झालेल्या भीषण स्फोटात 12 जणांचा मृत्यू झाला होता. तर 2 हजार 660 मालमत्तांचे नुकसान झालं होतं. या स्फोटाची चौकशी अद्यापही झालेली नसल्याने राज्य सरकारपर्यंत याचा अहवाल पोहोचलेला नाही. महसूल विभागाने नुकसान झालेल्या मालमत्तांचे पंचनामे करून 7 कोटी, 43 लाख रूपये मुख्यमंत्री मदत निधीतून मिळावे, अशी शिफारस केली आहे.पण सरकारदरबारी अजून सगळं थंडच आहे.११ महिने होऊनही मदत मिळाली नाही. त्यामुळे दुर्घटनाग्रस्त नागरिक नाराज आहेत. रविवारी राज ठाकरे डोंबिवलीत एका खासगी कार्यक्रमात आले होते. तेव्हा या रहिवाशांनी त्यांना निवेदन दिलं.यावेळी राज ठाकरे यांनी आपण मुख्यमंत्र्यांशी भेटून या संदर्भात बोलू, असं आश्वासन दिलं.
First published:

Tags: Raj Thackray

पुढील बातम्या