मुंबई, 22 फेब्रुवारी : महाराष्ट्रात कोरोनाचं (coronavirus) संकट पुन्हा एकदा वाढू लागलं आहे. त्यामुळे यंदा दहावी (Class X SSC board exam) आणि बारावीची परीक्षा (HSC Class xii exam) ऑनलाईन होणार की ऑफलाईन परीक्षा घेण्यावरच शिक्षण विभाग भर देणार, अशी चर्चा सुरू होती. मात्र ही परीक्षा ऑफलाईनच घेण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
दहावी आणि बारावी या महत्त्वाच्या इयत्तांच्या परीक्षा ऑनलाईन घेण्यास बोर्ड अनुकूल नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावी, बारावीच्या परीक्षांच्या तयारीचा आढावा शिक्षण विभागाने घेतला आहे. या परीक्षा सध्या तरी ठरलेल्या वेळापत्रकानुसार घेण्याबाबत आजच्या बैठकीत चर्चा झाली.
परीक्षा ऑनलाईन का नको?
ग्रामीण भागात इंटरनेट कनेक्टीव्हीटी नसल्याने विद्यार्थ्यी ऑनलाईन परीक्षा देऊ शकत नाहीत. त्यामुळे दहावी, बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच घेण्याबाबत बोर्डाचा आग्रह आहे. राज्यात दहावीचे 16 लाख तर बारावीचे 14 लाख विद्यार्थी आहेत. त्यामुळे कोरोना काळात इतकी मोठी संख्या असणाऱ्या विद्यार्थ्यांची ऑफलाईन परीक्षा नेमकी कशी होणार, हा प्रश्न आहेच.
कसं आहे वेळापत्रक?
महाराष्ट्र राज्य मंडळाने दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांचं वेळापत्रक काही दिवसांपूर्वी जाहीर केलं. दहावीची परीक्षा 29 एप्रिल ते 20 मे दरम्यान होईल. बारावीची बोर्डाची परीक्षा 23 एप्रिल ते 20 मे दरम्यान होणार आहे. बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर www.mahahsscboard.in या परीक्षेचं सविस्तर वेळापत्रक देण्यात आलं आहे.
यंदाच्या वर्षी 12वीची परीक्षा 23 एप्रिलपासून सुरू होईल तर 21 मे रोजी 12वीचा शेवटचा पेपर असेल, तर 10वीची परीक्षा 29 एप्रिल ते 29 मे या कालावधीमध्ये घेतली जाईल. 10वीच्या परिक्षेचा निकाल ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस आणि 12वी च्या परिक्षांचा निकाल जुलै महिन्याच्या अखेरीस लागणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona virus in india, Covid19, Education, Education department, Exam, Mumbai, Offline exams, Online exams