मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर डॅमेज कंट्रोल; मंत्रिपदासाठी बंजारा समाजातील 'या' नेत्याची चर्चा

संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर डॅमेज कंट्रोल; मंत्रिपदासाठी बंजारा समाजातील 'या' नेत्याची चर्चा

संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर बंजारा समाजात (भटके व विमुक्त समाज) निराशा पसरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे

संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर बंजारा समाजात (भटके व विमुक्त समाज) निराशा पसरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे

संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर बंजारा समाजात (भटके व विमुक्त समाज) निराशा पसरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे

मुंबई, 28 फेब्रुवारी : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी (Pooja Chavan suicide case) अखेर शिवसेनेचे नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांना वनमंत्री पदावरुन पायउतार व्हावे लागले आहे. पूजा प्रकरणावरुन चर्चेत असलेले वनमंत्री संजय राठोड हे राजीनामा देणार असल्याची जोरदाक चर्चा सुरू होती. अखेर राजीनामा दिला असून तो मंजूर करण्यात आला आहे. आज संजय राठोड व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये चर्चा सुरू होती. या चर्चेअंतीच संजय राठोड राजीनामा देणार असल्याचं समोर आलं आहे. (Damage control after Sanjay Rathore's resignation) (Discussion of this leader from Banjara community)

दुसरीकडे बंजारा समाजाचं नेतृत्व असलेले संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर बंजारा समाजात (भटके व विमुक्त समाज) निराशा पसरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. संजय राठोड यांना पदावरुन काढून टाकण्यासाठी म्हणजेच बंजारा समाजाच्या मोठ्या नेतृत्वाला धक्का लावण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही काही जणांकडून केला जात आहे. त्यामुळे राठोड यांच्या राजीनाम्यानंतर बंजारा समाज नाराज होऊ नये यासाठी पुसदचे राष्ट्रवादी पक्षाचे आमदार इंद्रनील नाईक (Indranil Naik) यांना राज्यमंत्रिपद देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याबाबत चर्चा करण्यासाठी इंद्रनील मुंबईत असल्याची बाब सूत्रांकडून कळली आहे.

हे ही वाचा -राठोडांनी राजीनामा न दिल्यास 'शक्ती' समितीतून भाजपचे सदस्य राजीनामे देतील-फडणवीस

महाराष्ट्रातील बंजारा समाजाच्या प्रमुख नेतृत्वांमध्ये संजय राठोड, वसंतराव नाईक, मनोहरराव नाईक यांचं नाव घेतलं जातं. नाईक घराण्यावर बंजारा समाजाची श्रद्धा आहे. त्याशिवाय इंद्रनील नाईक हे माजी मंत्री मनोहरराव नाईक यांचे पूत्र आणि माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे नातू आहेत.

First published:

Tags: Beed news, Pooja Chavan, Sanjay rathod, Sanjay rathod resign, Suicide