ठाणे, 27 जून: ज्यात अद्यापही कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव कायम आहे. त्यातच आता डेल्टा प्लस (Delta plus variant of Corona) या कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटमुळे निर्बंध आणखी कठोर करण्यात आले आहेत. मात्र, असे असतानाही काही नागरिक सर्रासपणे या नियमांकडे दुर्लक्ष करुन नियमांचे उल्लंघन करताना दिसतात. अशीच एक कारवाई ठाणे (Thane) पोलिसांनी एका लाऊंन्जवर केली आहे. कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. ठाण्यातील MH04 Lounge या लाऊंन्जमध्ये कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचं उघड झालं. या लाऊंन्जमध्ये ग्राहकांची तुफान गर्दी पाहायला मिळाली. या गर्दीचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
ठाण्यातील MH 04 Lounge वर नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई @News18lokmat pic.twitter.com/IrpgFIojIf
— News18Lokmat (@News18lokmat) June 27, 2021
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी लाऊंन्जकडे धाव घेत कारवाई केली आहे. या प्रकरणी ठाणे पोलिसांनी लाऊंन्ज मालकाविरोधात 133/21कलम 188, 269, 271 सह आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम 51ब, महाराष्ट्र कोविड उपाय योजना 2020 चे कलम 11, महाराष्ट्र पोलीस कायदा 33w प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता निर्बंध कोविडच्या डेल्टा आणि डेल्टा प्लस या व्हेरिएंटमुळे राज्यात संभाव्य तिसरी लाट येण्याचा धोका लक्षात घेता प्रतिबंधात्मक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. INSACOG (कोविड-19च्या संदर्भात संपूर्ण जिनोम सिक्वेन्सिंगसाठी स्थापित केलेला प्रयोगशाळांचा संघ) यांनी सूचित केल्यानुसार डेल्टा प्लस हा व्हेरिएंट खालील वैशिष्ट्यांमळे चिंतेचा विषय आहे. वाढती संक्रमणशीलता, फुप्फुसाच्या पेशींना मजबुतीने चिकटण्याची क्षमता मोनोक्लोनल अँटीबॉडीच्या प्रतिसादात संभाव्य घट तसेच ही व्हीओसी महाराष्ट्रात रत्नागिरी, जळगाव आणि इतर जिल्ह्यांत सापडले आहेत. त्यामुळे कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत.