मुंबई 22 सप्टेंबर: राज्यात गेल्या तीन दिवसांपासून नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. मंगळवारी 20 हजार 200 रुग्ण बरे झाले. तर 18 हजार 390 रुग्ण नव्याने आढळले आहेत. त्यामुळे बरे होण्याचं प्रमाणाची टक्केवारी 75 टक्क्यांपेक्षा जास्त झाले आहे. गेल्या 24 तासांमध्ये 398 लोकांचा करोन मुळे मृत्यू झाला.
राज्यात दिवसभरात राज्यात कोरोनाच्या 1 लाख 5 हजार 26 चाचण्या झाल्या आहेत. राज्यात सध्या 2 लाख 72 हजार रुग्णावर उपचार सुरू आहेत. 12 लाख 42 हजार 770 एवढी झाली आहे.
सोमवारी तब्बल 32 हजार रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. आत्तापर्यंत डिस्चार्ज होणाऱ्या रुग्णांची ही सर्वोच्च संख्या होती.
दरम्यान, राज्यात आणि मुंबईत कोरोना प्रकोप अजुनही कायम आहे. यातच श्रीमंत महापालिका अशी ओळख असलेल्या नवी मुंबई महापालिकेचा जीवघेणा कारभार समोर आला आहे. शहरातल्या हॉस्पिटल्सला गरज असताना आणि रुग्णसंख्या वाढल्यानंतरही महापालिकेने अद्याप व्हेंटिलेटर्सची खरेदी केली नसल्याचं उघड झालं आहे. शहरातला मृत्यूदर वाढत आहे, मात्र खरेदी प्रक्रिया लांबविली जात असल्याची शंका व्यक्त केली जात आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून व्हेंटिलेटर्सच्या खरेदीची प्रक्रिया रेंगाळली आहे. मर्जीतला ठेकेदार मिळावा यासाठी आरोग्य अधिकाऱ्यांनी प्रक्रिया लांबवली असल्याचा आरोप होत आहे.
चीनमुळे जगभरात कोरोना (Coronavirus) पसरला, असा आरोप अजूनही केला जात आहे. मात्र आता यासंबंधी ठोस पुरावे अमेरिकेनं सादर केले आहेत. अमेरिकेच्या संसदेच्या परराष्ट्र व्यवहार समितीच्या रिपोर्टमध्ये, कोरोना टाळता आला असता, असे सांगण्यात आले आहे. या रिपोर्टनुसार, कोरोनाचा उद्रेक होण्याच्या सुरुवातीच्या काळात चीनने काही गोष्टी लपविल्या नसत्या तर कोरोनाचा प्रसार टाळता आला असता. रिपोर्टमध्ये यासाठी जागतिक आरोग्य संघटनेलाही (WHO) जबाबदार ठरवण्यात आले आहे.