Home /News /mumbai /

Maharashtra Corona updates: राज्यात कोरोनाचं थैमान; गेल्या 5 दिवसात तब्बल 2100हून अधिक मृत्यू

Maharashtra Corona updates: राज्यात कोरोनाचं थैमान; गेल्या 5 दिवसात तब्बल 2100हून अधिक मृत्यू

दिवसभरात 23 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ही 10,419 एवढी झाली आहे.

दिवसभरात 23 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ही 10,419 एवढी झाली आहे.

Coronavirus in Maharashtra: महाराष्ट्रात कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. बाधितांच्या सोबतच मृतकांच्या संख्येतही मोठी वाढ होताना दिसत आहे.

    मुंबई, 20 एप्रिल: महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याचं पहायला मिळत आहे. कठोर निर्बंध लावण्यात आले असतानाही बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. रुग्णवाढीमुळे आरोग्य यंत्रणासुद्धा अपुऱ्या पडत आहेत. कुठे रुग्णांना बेड्स मिळत नाहीयेत तर कुठे ऑक्सिजन, रेमडेसिवीरचा तुटवडा जाणवत आहे. गेल्या पाच दिवसांच्या आकडेवारीवर नजर टाकली तर ही चिंता वाढवणारी अशी आहे. गेल्या पाच दिवसांत राज्यात 2100हून अधिक मृत्यू महाराष्ट्रात कोरोना बाधितांसोबतच मृतकांचा आकडाही वाढत (Covid patients death number increase) आहे. गेल्या 5 दिवसांत राज्यात तब्बल 2190 कोरोना बाधितांनी आपले प्राण गमावले आहेत. ही आकडेवारी नक्कीच चिंता वाढवणारी आहे. पाहूयात गेल्या पाच दिवसांतमधील राज्यातील आकडेवारी. 16 एप्रिल - 398 मृत्यू 17 एप्रिल - 419 मृत्यू 18 एप्रिल - 503 मृत्यू 19 एप्रिल - 351 मृत्यू 20 एप्रिल - 519 मृत्यू वाचा: कोरोनाविरोधी लढ्यात PM मोदींचं तरुणांना एक आवाहन; सोपवली मोठी जबाबदारी आज महाराष्ट्रात 62,097 कोरोना बाधितांची नोंद झाली आहे तर तब्बल 519 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर 1.55% इतका आहे. आज 54,224 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 2,43,41,736 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 39,60,359 म्हणजेच 16.27 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 38,76,998 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 27,690 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 20 एप्रिल 2021 च्या आकडेवारीनुसार राज्यात सध्यस्थितीत 6,83,856 सक्रिय रुग्ण आहेत. लॉकडाऊनचा निर्णय महाराष्ट्रात कठोर निर्बंध लागू करण्यात आले असतानाही कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. नागरिकही विनाकारण गर्दी करताना दिसत आहे. यामुळेच आता राज्य सरकारने संपूर्ण लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. या संबंधित आज मंत्रिमंडळ बैठकीत एकमत झाल्याची माहिती समोर आली आहे. लवकरच मुख्यमंत्री लॉकडाऊनच्या संबंधीत घोषणा करतील आणि त्यानंतर मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात येतील.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Coronavirus, Covid-19, Maharashtra

    पुढील बातम्या