मुंबईची परिस्थिती गंभीर! शहरात फक्त 1 टक्का ICU बेड शिल्लक

मुंबईची परिस्थिती गंभीर! शहरात फक्त 1 टक्का ICU बेड शिल्लक

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत केवळ रुग्णांच्या वाढीचं नाही तर रुग्णालयाचंही मोठं संकट आहे. कोरोना रुग्णांचा आकडा वाढत असला तरी, त्यांची सोय करण्यासाठी मुंबई महानगर पालिकेकडे विशेष सोय नसल्याचं दिसत आहे.

  • Share this:

मुंबई, 29 मे : देशात कोरोनाबाधितांच्या (Coronavirus) संख्या दिवसेदिवस वाढत असताना मुंबई हे कोरोनाचं केंद्र झालं आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत केवळ रुग्णांच्या वाढीचं नाही तर रुग्णालयाचंही मोठं संकट आहे. कोरोना रुग्णांचा आकडा वाढत असला तरी, त्यांची सोय करण्यासाठी मुंबई महानगर पालिकेकडे विशेष सोय नसल्याचं दिसत आहे. पालिकेच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत शहरातील 99% अतिदक्षता विभागातील बेड (ICU Beds) आणि 72% व्हेंटिलेटर व्यापलेले आहेत. जी रुग्णालयं कोव्हिड-19च्या गंभीर रुग्णांवर उपचार करत आहेत ती देखील 96 टक्के भरले आहेत.

दुसरीकडे मुंबई कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. गुरुवारी एकाच दिवशी कोरोनाचे 1438 नवीन रुग्ण सापडते. त्यामुळं महानगरातील संक्रमणाचा आकडा 35 हजार पार झाला. महानगरपालिकेनं दिलेल्या आकडेवारीनुसार गेल्या 24 तासांत 38 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, आतापर्यंत 9817 लोकांनी कोरोनावर मात केली आहे. गेल्या 24 तासांत 763 रुग्ण निरोगी झाले आहेत.

पालिका कर्मचाऱ्यांवरही कोरोनाचं संकट

लोकांच्या सुरक्षेसाठी काम करणाऱ्या पालिका कर्मचाऱ्यांवरही कोरोनाचं संकट आहे. आतापर्यंत पालिकेच्या 1529 फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर कोव्हिड-19 मुळं 25 लोकांचा मृत्यू झाला आहे. सफाई कर्मचारी आणि इतर विभागातील कर्मचारी कोरोनाच्या संकटातही काम करत असल्यामुळं त्यांना या व्हायरसचा धोका आहे. पीपीई किट आणि इतर सुविधाही कमी पडत असल्यामुळं सध्या पालिकेच्या कर्मचाऱ्यांवर कोरोनाचं संकट आलं आहे.

First Published: May 29, 2020 09:37 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading