• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • LIVE : पुण्यात दिवसभरात 5138 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ, 75 जणांचा मृत्यू

LIVE : पुण्यात दिवसभरात 5138 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ, 75 जणांचा मृत्यू

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | April 20, 2021, 23:27 IST
  LAST UPDATED A YEAR AGO

  हाइलाइट्स

  21:30 (IST)

  पंतप्रधान नरेंद्र मोदींचा देशवासीयांशी संवाद
  देशाची कोरोनाविरोधात मोठी लढाई -मोदी
  कोरोनाची दुसरी लाट वादळासारखी -मोदी
  'कोरोनामुळे जीव गमावलेल्या सर्वांना श्रद्धांजली'
  कुटुंबाचा सदस्य म्हणून मी तुमच्यासोबत -मोदी
  कोरोनायोद्ध्यांचं पंतप्रधान मोदींकडून कौतुक
  डॉक्टर्स, आरोग्य कर्मचाऱ्यांचे मानले आभार
  स्वच्छता कर्मचाऱ्यांचे मोदींनी मानले आभार
  पोलिसांचं कार्यही अत्यंत मोलाचं -नरेंद्र मोदी
  'कोरोनाकाळात फार्मा सेक्टरचं उत्तम काम'
  देशात औषधांची निर्मिती वाढली आहे -मोदी
  'देशात ऑक्सिजनची मागणी प्रचंड वाढली'
  'ऑक्सिजनच्या निर्मितीसाठी सर्वतोपरी प्रयत्न'
  'ऑक्सिजन प्रकल्प, ऑक्सिजन रेल्वे असे प्रयत्न'
  'ऑक्सिजनचं उत्पादन आणखी वाढवणार'
  'भारतात लसीची मोठ्या प्रमाणावर निर्मिती'
  'भारतानं जगातली सर्वात स्वस्त लस तयार केली'
  शास्त्रज्ञांच्या मेहनतीचं फळ आज मिळतंय -मोदी
  जगातील सर्वात मोठं लसीकरण भारतात -मोदी
  1 मेपासून 18 वर्षांवरील सर्वांचं लसीकरण -मोदी
  सरकारी रुग्णालयांमध्ये लस मोफत -नरेंद्र मोदी
  देशात लसीकरणाचा वेग दुप्पट करणार -मोदी
  'कोरोनायोद्धा आणि बहुतांश ज्येष्ठांचं लसीकरण पूर्ण'
  'देशात आतापर्यंत 12 कोटी लोकांचं लसीकरण पूर्ण'
  कामगार, मजुरांनी स्थलांतर करू नये -मोदी
  आरोग्य सुविधा कमी पडू देणार नाही -मोदी
  राज्यांनी परप्रांतीयांना विश्वास द्यावा -मोदी
  'प्रसारमाध्यमांनी लोकांना सतर्क, जागरूक करावं'
  पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट वेगळी -मोदी
  विनाकारण घराबाहेर पडू नका -नरेंद्र मोदी
  'मायक्रो कंटन्मेंट झोनवर लक्ष केंद्रित करा'
  देशाला लॉकडाऊनपासून वाचवायचं आहे -मोदी
  'राज्यांनी लॉकडाऊन हा अंतिम पर्याय ठेवावा'
  पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सर्व राज्यांना आवाहन 

  20:14 (IST)

  FDA आयुक्त काळेंची तडकाफडकी बदली
  अभिमन्यू काळेंना रेमडेसिवीर प्रकरण भोवलं
  राज्य सरकारकडून काळेंच्या बदलीचा निर्णय
  परिमल सिंग यांच्याकडे FDA आयुक्तपदाची सूत्र 

  19:38 (IST)

  'महाराष्ट्रात पुन्हा कडक लॉकडाऊन लागणार'
  'मंत्रिमंडळ बैठकीत कडक लॉकडाऊनचा निर्णय'
  'निर्बंधांनंतरही रुग्णसंख्या, गर्दी आटोक्यात नाही'
  'राज्यात उद्या रात्री 8 पासून कडक लॉकडाऊन'
  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या घोषणा करणार
  'लवकरच कडक लॉकडाऊनची नियमावली'
  कठोर लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही -आरोग्यमंत्री
  दहावीची परीक्षा रद्द -शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड 

  17:21 (IST)

  राज्यातील तुरुंगांमध्येही कोरोनाचा मोठा संसर्ग
  197 सक्रिय कैदी तर 94 जेल कर्मचारी बाधित
  आतापर्यंत 7 कैदी, 8 जेल कर्मचाऱ्यांचा मृत्यू
  राज्यातील अनेक जेलमध्ये क्षमतेपेक्षा जास्त कैदी
  कोरोनाचा धोका आणखी वाढण्याची भीती 

  15:59 (IST)

  'न्यूज18 लोकमत'च्या बातमीचा इम्पॅक्ट
  मुंब्र्यातील कौसा कोविड सेंटर अखेर सुरू 
  कोविड सेंटरमध्ये 5 रुग्णांना केलं दाखल
  जवळपास 600 बेड्सचं कौसा कोविड सेंटर
  कौसा कोविड सेंटर पडलं होतं धूळखात
  'न्यूज18 लोकमत'नं दाखवलं होतं वास्तव
  पाठपुराव्यामुळे ठाणेकरांना मोठा दिलासा 

  15:49 (IST)

  राज्य सरकारकडून नवीन नियमावली
  वाढत्या रुग्णांमुळे निर्बंध आणखी कडक
  अत्यावश्यक सेवा दुकानांना वेळेचं बंधन
  किराणा दुकानं 4 तासच सुरू राहणार
  किराणा दुकानं सकाळी 7 ते सकाळी 11
  दूध,दुग्धजन्य पदार्थ सकाळी 7 ते सकाळी 11
  भाजीपाला विक्री सकाळी 7 ते सकाळी 11
  फळे विक्री (द्वार वितरण) सकाळी 7 ते स.11
  बेकरी, अंडी, मटण, चिकन, मासे स.7 ते स.11
  पाळीव प्राण्यांची खाद्य दुकानं स.7 ते स.11
  पशुखाद्य विक्री सकाळी 7 ते सकाळी 11
  कृषीसंबंधित सर्व सेवा सकाळी 7 ते सकाळी 11
  पावसाळ्याशी संबंधित वस्तूंची दुकानं स.7 ते स.11
  हॉटेल, रेस्टॉरंट्मध्ये फक्त पार्सल सेवा
  होम डिलिव्हरी मात्र सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत
  पेट्रोल, डिझेल, सीएनजीच्या वेळेवर निर्बंध नाही

  राम नवमीसाठी राज्य सरकारकडून नियमावली
  प्रभात फेरी काढण्यास मनाई, मंदिरं बंदच राहणार 

  13:21 (IST)

  नगरमध्ये 2 तास पुरेल इतकाच ऑक्सिजन
  12 रुग्णालयांमधील ऑक्सिजन संपणार
  ऑक्सिजन संपणार असल्यानं डॉक्टर भयभीत

  12:23 (IST)

  'कोरोनामुळे राज्याची परिस्थिती बिकट'
  परिस्थिती सुरळीत करण्याचे प्रयत्न - महापौर
  'कोरोनाशी सर्वांनी एकत्र लढलं पाहिजे'
  संकटकाळात विरोधकांकडून राजकारण - महापौर
  'काळाबाजार करणाऱ्यांना विरोधकांचा पाठिंबा'
  मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांचा आरोप
  वैश्विक महामारीमुळे ताण वाढलाय - महापौर

  11:32 (IST)

  मुंबई - रेमडेसिवीरचा बेकायदेशीर साठा जप्त
  मरोळ, मरीन लाईन्स परिसरात छापा
  मुंबई पोलीस, एफडीएची संयुक्त कारवाई
  मरोळमध्ये 2 हजार रेमडेसिवीर जप्त
  मरीन लाईन्समध्ये 200 रेमडेसिवीर जप्त
  2,200 रेमडेसिवीर एफडीएकडे जमा
  इंजेक्शन रुग्णालयांना देणार - पोलीस

  11:14 (IST)

  8 लाख रेमडेसिवीर खरेदीचं टेंडर
  2 मोठ्या कंपन्यांनी भरलं होतं टेंडर
  30 मेनंतर इंजेक्शन देण्याची एकाची अट
  रोज 500 इंजेक्शन देण्याचं दुसऱ्याचं उत्तर
  दोन्ही कंपन्यांच्या उत्तरामुळे सरकारसमोर पेच

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स