क्वारंटाइन रुग्णांची माहिती महापालिकेला बसल्याजागी मिळणार, मराठी उद्योजकानं तयार केलं अॅप

क्वारंटाइन रुग्णांची माहिती महापालिकेला बसल्याजागी मिळणार, मराठी उद्योजकानं तयार केलं अॅप

आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांना घरबसल्या आता होम क्वारंटाइन असलेल्या लोकांच्या आरोग्याबद्दल माहिती मिळू शकणार आहे.

  • Share this:

मुंबई, 30 मार्च : देशातील सर्वात जास्त महाराष्ट्रात कोरोनाग्रस्त 215 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांना घरबसल्या आता होम क्वारंटाइन असलेल्या लोकांच्या आरोग्याबद्दल माहिती मिळू शकणार आहे. ही माहिती एक अॅपद्वारे आरोग्य विभागाला बसल्याजागी मिळू शकणार आहे. असं एक नवीन अॅप डेव्हलप करण्यात आलं आहे. पनवेलमधील विकास औटे नावाच्या मराठी तरुण उद्योजकाने हे अॅप विकसित केलं आहे.

कोविगार्ड आणि कोविकेअर अशी या दोन अॅपची नावं आहेत. महानगरपालिकेद्वारे आरोग्य सेवा दिल्या जाणाऱ्या भागात कोविकारे नावाच्या अॅपची लिंक सोसायटीच्या प्रतिनिधिंना पाठवण्यात येणार आहे. या लिंकवर क्लिक करून प्रतिनिधीने सोसायटीतील नागरिकांचे तपशील द्यायचे आहेत. कोविकेअर आणि कोविगार्ड या दोन्ही अॅपच्या मदतीने प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचणं अधिक सोपं होणार आहे. या अॅपचा वापर पनवेल, ठाणे आणि नवी मुंबई महापालिकेनं आपल्या क्षेत्रात वापर करण्यास सुरुवात केली आहे.

एबीपी माझानं दिलेल्या वृत्तानुसार कोरोनाचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी आणि झपाट्यानं वाढणारा हा संसर्ग रोखण्यासाठी प्रत्येक नागरिकाची माहिती ठेवणं आणि डेटाबेस जमा करून तो पालिकेला देण्याचं काम हे अॅप करणार आहे. नागरिकांच्या आरोग्याची माहिती सरकारपर्यंत योग्य पद्धतीनं आणि अचूक पोहोचण्यासाठी याचा वापर केला जाणार आहे. या अॅपमध्ये वैयक्तीक चॅटची सुविधादेखील देण्यात आली आहे.

आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या 215वर पोहोचली आहे. रविवारी सकाळी 12 नवीन रुग्णाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे आहेत. पुण्यात 5, मुंबई 3, नागपूर 2, नाशिक आणि कोल्हापुरात प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. शनिवारपर्यंत 203 रुग्ण कोरोनाबाधित असल्याची माहिती समोर आली होती.

First published: March 30, 2020, 10:54 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading