मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /मुंबईकरांसाठी खूशखबर! उद्यापासून दिली जाणार कोरोना लस

मुंबईकरांसाठी खूशखबर! उद्यापासून दिली जाणार कोरोना लस

तांत्रिक कारणामुळे मुंबईतील कोरोना लसीकरण (Corona vaccination) मोहीम दोन दिवसांसाठी स्थगित करण्यात आली होती.

तांत्रिक कारणामुळे मुंबईतील कोरोना लसीकरण (Corona vaccination) मोहीम दोन दिवसांसाठी स्थगित करण्यात आली होती.

तांत्रिक कारणामुळे मुंबईतील कोरोना लसीकरण (Corona vaccination) मोहीम दोन दिवसांसाठी स्थगित करण्यात आली होती.

मुंबई, 18 जानेवारी : 16 जानेवारीपासून भारतात कोरोना लसीकरण (corona vaccination) केलं जातं आहे. दरम्यान मुंबईत लसीकरणाच्या (mumbai corona vaccination) पहिल्याच दिवशी कोविनमध्ये (Cowin) तांत्रिक बिघाड झाल्यामुळे लसीकरण दोन दिवस स्थगित करण्यात आलं होतं. कोरोना लसीकरणाची पूर्ण प्रक्रिया यामार्फतच केली जाते आहे. पण आता मुंबईत स्थगित झालेला लसीकरण कार्यक्रम उद्यापासून (19 जानेवारी, 2020) पुन्हा सुरू होणार आहे.

16 जानेवारीला मुंबईत कोरोना लसीकरण सुरू असताना लसीकरणाची संपूर्ण प्रक्रिया ज्या अॅपवर अवलंबून आहे, त्या कोविन अॅपमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. त्या दिवशी ऑफलाईन नोंदी करण्यास परवानगी शासनाने दिली होती. पण यापुढील सर्व नोंदी ॲप द्वारेच करण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळे मुंबईत रविवार दिनांक 17 जानेवारी आणि सोमवार दिनांक 18 जानेवारी असे दोन दिवस कोव्हिड 19 लसीकरण स्थगित ठेवण्यात आलं होतं.

दरम्यान कोविन अॅप अद्यापही सुरळीत झालेलं नाही पण  उद्यापासून कोरोना लस दिली जाणार आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेनं दिली आहे. मुंबईत चार दिवस लसीकरण कार्यक्रम असेल. मंगळवार, बुधवार, शुक्रवार आणि शनिवार लस दिली जाईल. मुंबई महापालिका क्षेत्रात दररोज 4000 जणांना लस देण्यात येईल. अशी माहिती देण्यात आली आहे.

हे वाचा - 'कोरोना लस घेतल्यानंतर मला...', AIIMS च्या संचालकांनी मांडला आपला अनुभव

लसीकरणानंतर मुंबईत 2 लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. एका व्यक्तीला लो ब्लड प्रेशर तर दुसऱ्याला इतर समस्या उद्भवू लागली. दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.  शिवाय किरकोळ स्वरूपाच्या 200 हून अधिक तक्रारी आल्या आहेत. यामध्ये ताप येणं, अंगदुखी आणि अंगावर साधं पुरळ अशा समस्या उद्भवल्या आहेत. आतापर्यंत कुणालाही गंभीर स्वरूपाचे दुष्परिणाम झालेले नाहीत, अशी माहितीही प्रशासनानं दिली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना लस घेतल्यानंतर आतापर्यंत एकूण 447 लोकांवर प्रतिकूल परिणाम पाहायला मिळाला आहे. यापैकी तीन लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. काही लोकांना वॅक्सिनच्या किरकोळ समस्या दिसल्या असल्या तरी, ही सौम्य लक्षणं असल्याने घाबरण्याची गरज नसल्याचं सांगण्यात आलं आहे.

हे वाचा - कोरोना लस घेतल्यानंतर आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू; मोदी सरकारनं दिलं स्पष्टीकरण

एम्सचे  (AIIMS) संचालक आणि राष्ट्रीय कोव्हिड 19 टास्क फोर्सचे (National Task Force on COVID19) सदस्य डॉ. रणदीप गुलेरिया (Dr. Randeep Guleria) यांनी सांगितलं, "लोक कोणत्याही प्रकारची औषधं घेत असतील तर त्यांना लशीमुळे काही अॅलर्जीक रिअॅक्शन होऊ शकते. शरीरात वेदना, लस घेतलेल्या शरीराच्या भागावर वेदना, सौम्य ताप असे सामान्य साइड इफेक्ट होऊ शकतात. पण 10 टक्क्यांपेक्षा कमी लोकांनाच या समस्या उद्भवण्याची शक्यता आहे.  लशीमुळे हार्ट अटॅक येऊ शकत नाही. देशात लशीमुळे कुणाचाही मृत्यू झालेला नाही"

First published:

Tags: Corona vaccine, Mumbai