मुंबईतील कोरोनाग्रस्त 40 वर्षीय महिलेचा मृत्यू, देशातील तिसऱ्या तरुणाचा व्हायरसनं घेतला जीव

मुंबईतील कोरोनाग्रस्त 40 वर्षीय महिलेचा मृत्यू, देशातील तिसऱ्या तरुणाचा व्हायरसनं घेतला जीव

महिलेला छातीत दुखत होते आणि गेल्या तीन-चार दिवसांपासून श्वास घेण्यास त्रास होत होता.

  • Share this:

मुंबई, 29 मार्च : महाराष्ट्रात कोरोनाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबईतील केईएम रुग्णालयात 40 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईतील हा चौथा तर राज्यातील 07 वा मृत्यू असल्याची माहिती समोर आली आहे. या महिलेला अस्वस्थ वाटत असल्यानं शनिवारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. आज या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. राज्यातील सर्वाधिक कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या मुंबईत आहे. आतापर्यंत मुंबईत 109 जणांना कोरोनाची लागण झाली असून मुंबईत आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या 193 वर पोहोचली आहे. पुण्यात 1, मुंबईत, 4 सांगलीमध्ये 1 तर नागपुरात 1 असे नवीन 7 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. शनिवारी महाराष्ट्रात 28 नवे कोरोनाचे रुग्ण आढळले होते.

मिळालेल्या माहितीनुसार महिलेला छातीत दुखत होते आणि गेल्या तीन-चार दिवसांपासून श्वास घेण्यास त्रास होत होता. यामुळे शनिवारी महिलेला मुंबईतील केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारासाठी दाखल केल्यानंतर 24 तासांतच त्यांचा मृत्यू झाला. अशाप्रकारे, COVID-19मुळे महाराष्ट्रात मृतांची संख्या सात झाली आहे.

भारतात आतापर्यं कोरोनामुळे 25 जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार 24 तासात 6 जणांचा मृत्यू झाला आहे. दिल्ली, गुजरात, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, जम्मू-कश्मीर आणि तेलंगाना में एक-एक कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे.

First published: March 29, 2020, 1:34 PM IST

ताज्या बातम्या