जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / नाना पटोलेंच्या नियुक्तीनंतर बदलली काँग्रेस, अधिवेशनावेळी दिसणार नवं रूप

नाना पटोलेंच्या नियुक्तीनंतर बदलली काँग्रेस, अधिवेशनावेळी दिसणार नवं रूप

नाना पटोलेंच्या नियुक्तीनंतर बदलली काँग्रेस, अधिवेशनावेळी दिसणार नवं रूप

प्रदेशाध्यपदी निवड झाल्यापासून काँग्रेस नेते नाना पटोले हे सातत्याने अ‍ॅक्शन मोडमध्ये दिसत आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 28 फेब्रुवारी : प्रदेशाध्यपदी निवड झाल्यापासून काँग्रेस नेते नाना पटोले हे सातत्याने अ‍ॅक्शन मोडमध्ये दिसत आहेत. पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून त्यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारविरोधात दंड थोपटले असून आणखी एका आंदोलनाची घोषणा केली आहे. महाराष्ट्र अर्थसंकल्पीय अधिवेशनात केंद्र सरकारने केलेल्या पेट्रोल डिझेल दरवाढीच्या विरोधात लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसचे सर्व आमदार पहिल्या दिवशी सायकलवर अधिवेशनात येणार आहे.  ‘आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती निचांकी पातळीवर असताना देशात मात्र इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. केंद्र सरकारने लावलेल्या अन्यायकारक करांमुळे इंधनाचे दर वाढले असून महागाई प्रचंड वाढली आहे. याचा निषेध म्हणून अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सोमवारी 1 मार्च रोजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह काँग्रेस पक्षाचे मंत्री व सर्व आमदार सकाळी 10 वाजता मंत्रालयासमोरील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करून सायकलवरून विधानभवनात येणार आहेत,’ अशी माहिती काँग्रेसकडून देण्यात आली आहे. ‘केंद्र सरकारकडून दरोडेखोरी’, नक्की काय आहे काँग्रेसचा आरोप? ‘केंद्र सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे देशाची अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. इतिहासात कधी नव्हे एवढ्या मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली आहे. काँग्रेस सरकारांनी उभारलेले सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग विकण्याचा सपाटा केंद्र सरकारने लावला आहे. यासोबतच पेट्रोल, डिझेलवर मोठ्या प्रमाणात कर लावून जनतेची लूट सुरु आहे. स्वयंपाकाच्या गॅसचे दर प्रचंड प्रमाणात वाढवल्याने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. कोरोना संकटाच्या काळात लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. अनेकांना मोठ्या वेतनकपातीचा सामना करावा लागतो आहे. छोटे व्यापारी, लघु व मध्यम बंद झाल्याने अनेकजण बेरोजगार झाले आहेत. त्यातच इंधन आणि गॅस दरवाढीमुळे या घटकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने इंधनावरील अन्यायी करवाढ मागे घेऊन सर्वसामान्यांना दिला पाहिजे,’ अशी मागणी काँग्रेसने केली आहे. हेही वाचा - संजय राठोडांचा राजीनामा मंजूर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय ‘डिसेंबरपासून आजपर्यंत तीन महिन्यांच्या कालावधीत गॅस सिलेंडरच्या दरात 200 रुपयांची वाढ केली आहे. 800 रुपयांचे सिलेंडर घेणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. त्यामुळे आमच्या माता भगिणींना पुन्हा चुलीचा आधार घ्यावा लागतो आहे. करांशिवाय आज पेट्रोलची किंमत 32 रुपये 72 पैसे प्रति लिटर आणि डिझेलची किंमत 33 रुपये 46 पैसे प्रति लिटर आहे. पण मोदी सरकारने डिझेलवर 820 टक्के तर पेट्रोलवर 258 टक्के एक्साईज ड्यूटी लावून पेट्रोलचे दर 100 रुपये लिटर वर तर डिझेलचे दर 90 रुपये लिटरपर्यंत वाढवले आहेत. मुंबईत पॉवर पेट्रोलचे दर 100 रुपयांच्या वर गेले आहेत. यासोबतच 2001 ते 2014  या चौदा वर्षाच्या काळात पेट्रोल डिझेलवर प्रति लिटर 1 रुपया सेंट्रल रोड फंड सेस लावला जात होता. 2018 मध्ये याचे नाव बदलून सेंट्रल रोड आणि इन्फ्रास्ट्रक्चर फंड करुन 1 रूपयांवरून तो 18 रु. प्रतिलिटर केला. सध्या पेट्रोल आणि डिझेलवर प्रति लिटर 18 रु. सेंट्रल रोड आणि इन्फ्रास्ट्रक्चर फंडासाठी घेतले जातात. तसेच पेट्रोलवर प्रति लिटर 2.50 तर डिझेलवर प्रति लिटर 4 रुपये कृषी सेस घेतला जातो. एवढ्या मोठ्या प्रमाणात इंधनावर कर लावणे ही दरोडेखोरी असून केंद्रातील भाजप सरकारने ती थांबवावी,’ असा घणाघात काँग्रेसकडून करण्यात आला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात