Home /News /mumbai /

आता काय करायचं? पवारांच्या बैठकीला दांडी मारल्यानंतर ‘मातोश्री’वर खलबतं!

आता काय करायचं? पवारांच्या बैठकीला दांडी मारल्यानंतर ‘मातोश्री’वर खलबतं!

    मुंबई, २९ जून : मुंबई, २९ जून : महाराष्ट्राच्या (Maharashtra) राजकारणामध्ये मोठी उलथापालथ झाली आहे. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यपालांनी (Governor Bhagat Singh Koshyari) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध (mva government floor test) करण्यासाठी आदेश दिले आहे. राष्ट्रवादीसोबत बैठकीला गैरहजर राहिल्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर बैठक सुरू आहे. मातोश्रीवर शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांची बैठक सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटायला संजय राऊत, विनायक राऊत, अरविंद सावंत हे 3 खासदार आले आहेत. तर वैभव नाईक,मिलिंद नार्वेकर सहभागी आहे. सकाळी सिल्व्हर ओकला झालेल्या मविआ बैठकीत, सेना नेते गैरहजर होते. त्यामुळे या बैठकीत नेमकं काय शिजतं ? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. राज्यपालांनी दिलेल्या या आदेशानंतर राजकीय घडामोडींना वेग आलाय. सर्व बंडखोर आमदार गुरूवारी मुंबईत येणार असल्याचं त्यांचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिलीय. तर भाजपानंही त्यांच्या सर्व आमदारांना मुंबईत येण्याचे आदेश दिले आहेत. विरोधी पक्ष कामाला लागलेला असतानाच महाविकास आघाडीची धाकधूक वाढली आहे. राज्यपालांच्या आदेशावर चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार (Sharad Pawar) यांनी महत्त्वाची बैठक त्यांच्या निवावस्थानी बोलावली होती. या बैठकीला शिवसेनेते नेते अनुपस्थित होते. त्यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षात धाकधूक वाढली. शिवसेनेचा एकही नेता बैठकीत उपस्थित नसल्याने महाविकास आघाडी मधील नेत्यांची धाकधूक वाढली. दरम्यान, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी आज सकाळीच महाविकास आघाडीला पत्र पाठवले आहे. त्यामुळे उद्या गुरुवारी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करण्यास सांगितले आहे. एवढ्या कमी वेळेत तयारी कशी पूर्ण होणार अशी चर्चा रंगली होती. पण, विधानभवनाने तयारी पूर्ण केली आहे. तर भाजप, काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीने आमदारांना हजर राहण्याचे आदेश दिले आहे. तर बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांचा गट गुवाहाटीवरून निघाला आहे. आधी गोव्या मुक्कामी थांबणार आहे. त्यानंतर उद्या मुंबईमध्ये दाखल होणार आहे. तर, महाराष्ट्र सरकार आणि उपाध्यक्षांचे वकील सर्वोच्च न्यायालयात बहुमत चाचणीच्या विरोधात तातडीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती पार्टीवाला यांच्या द्विसदस्यीय खंडपीठ सुनावणी झाली. यावेळी अभिषेक मनू सिंघवी यांनी जोरदार युक्तिवाद केला. राज्यपालांनी बोलावलेले अधिवेशन बेकायदेशीरपणे आहे, बहुमत चाचणी घेतली जाणार नाही. आज सायंकाळी सुनावणी घ्यावी. अशी विनंती सिंघवी यांनी केली. सुप्रीम कोर्टांने महाविकास आघाडीचे ऐकून घेतले आहे. दुपारी ३ वाजेपर्यंत कागदपत्र सादर करण्यास सांगितले आहे. त्यानंतर संध्याकाळी ५ वाजता सुनावणी होणार आहे.
    First published:

    पुढील बातम्या