Home /News /mumbai /

Uddhav Thackeray LIVE: राजीनाम्याचं पत्र तयार; हिंदुत्वाबद्दल काय म्हणाले उद्धव ठाकरे?

Uddhav Thackeray LIVE: राजीनाम्याचं पत्र तयार; हिंदुत्वाबद्दल काय म्हणाले उद्धव ठाकरे?

हो, मला धक्का बसला! उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलं मनोगत.

  मुंबई, 22 जून: आताही हिंदूच आहोत. मुद्दा आणि विचार हा हिंदुत्ववादीच असणार आहे. 63 आमदार निवडून आणले ते बाळासाहेबांच्या शिवसेनेनंतरच आले. शिवसेनेने हिंदुत्व सोडलेलं नाही, हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. "मी जबाबदारी जिद्दीने पार पाडतो. शिवसेनाप्रमुखांना दिलेला शब्द पाळण्यासाठी रणांगणात उतरलो. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने विशेषतः पवार साहेबांनी एका खोलीत जाऊन सांगितलं की जबाबदारी तुम्हाला घ्यावी लागेल. काँग्रेस-राष्ट्रवादीकडे ज्येष्ठ लोक आहेत, पण तुम्ही नसाल तर सरकार होणार नाही. मग त्या जिद्दीने मुख्यमंत्री झालो. सोनिया गांधीसुद्धा आपुलकीने विचारत असतात. फक्त स्वार्थ हा विचार या पदामागे नव्हता. काँग्रेसच्या कमलनाथजींनी आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनीसुद्धा मला समर्थन दाखवलं. पण माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्रिपदी नको असेन तर काय करायचं? सुरतला जाऊन बोलण्यापेक्षा माझ्यासमोर येऊन सांगायचं, तुम्ही मुख्यमंत्रिपदी नको."

  वाचा - ठाकरे सरकारचा खेळ खल्लास! एकनाथ शिंदे यांच्या गटाचं पत्र आलं समोर, 34 आमदारांच्या सह्या

  " वेदना का होतात, तर कुऱ्हाडीच्या लाकडाच्या वेदना जास्त होतात. कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ. मी राजीनामा देण्यास तयार. पत्र तयार आहे. आमदारांना ज्यांनी गायब केलेलं आहे. मी का जात नाही? कारण मला कोविड झालाय. हा अगतिकपणा नाही", असं ठाकरे म्हणाले.
  " मुख्यमंत्री भेटत नाहीत, हा आरोप काही महिन्यांपूर्वीपर्यंत सत्य होता. त्याला कारण होतं. शस्त्रक्रियेमुळे भेटणं शक्य नव्हतं. आजारपणात मी ऑनलाईन काम करत होतो. हिंदुत्व हा आमचा श्वास आहे. शिवसेना बाळासाहेबांच्या विचारांनीच पुढे जात आहे. एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांवर पाळत ठेवली होती. लघूशंकेला गेलेल्या आमदारांवर पाळत ठेवता ही कसली लोकशाही? मी खरंतर शरद पवारांच्या आग्रहाखातर मुख्यमंत्री पद स्वीकारलं", असं मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेसमोर मांडले.
  First published:

  पुढील बातम्या