जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / Mumbai Pollution : BKC बनले प्रदूषणाचे व्यावसायिक केंद्र, दुप्पट विषारी हवेने वाढवला त्रास

Mumbai Pollution : BKC बनले प्रदूषणाचे व्यावसायिक केंद्र, दुप्पट विषारी हवेने वाढवला त्रास

bkc file photo

bkc file photo

मुंबईकरांसाठी ही धोक्याची घंटा आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 28 फेब्रवारी : मुंबईतील पहिले नियोजित व्यावसायिक केंद्र वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) प्रदूषणाचे केंद्र बनले आहे. गेल्या तीन वर्षांपासून हा परिसर प्रदूषणाच्या बाबतीत अव्वल आहे. येथील प्रदूषणाची पातळी सुरक्षित मर्यादेपेक्षा दुप्पट असल्याचे आढळून आले आहे. SAFAR या हवेच्या गुणवत्तेवर नजर ठेवणाऱ्या संस्थेच्या मते, 10 मॉनिटरिंग स्टेशनपैकी, BKC हे वायू प्रदूषणाच्या बाबतीत सर्वात वाईट आहे. यानंतर पश्चिम उपनगर अंधेरी आणि पूर्व उपनगर चेंबूरची हवाही प्रदूषित आढळून आली आहे. 2019-20 मध्ये BKC मध्ये PM-10 पार्टिक्युलेट मॅटरची पातळी 114 मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर इतकी होती. हे प्रमाण 2020-21 मध्ये 122 आणि 2021-22 मध्ये 121 मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर इतके वाढले आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानुसार 60 मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर सुरक्षित पातळी मानली जाते. बीकेसीमध्ये ते राष्ट्रीय सरासरीच्या दुप्पट आहे. बीएमसीने आपल्या वार्षिक पर्यावरण स्थिती अहवालात बीकेसीमधील प्रदूषणासाठी वाहने आणि बांधकामांना जबाबदार धरले आहे. ‘वाहन आणि बांधकाम या दोन्ही जबाबदार’ - वातावरण फाउंडेशनचे संस्थापक भगवान केशभट्ट म्हणाले, “BKC मध्ये खाजगी आणि अनेक सरकारी संस्थांची कार्यालये देखील आहेत. त्यामुळे येथे खासगी वाहनांची वर्दळ अधिक असते. एमएमआरडीएने स्थापन केलेल्या या हबमध्ये अनेक सरकारी प्रकल्पांची बांधकामेही सुरू आहेत. उड्डाणपूल बांधला जात आहे. येत्या काही दिवसांत बुलेट ट्रेन प्रकल्पाचे कामही सुरू होणार आहे. यामुळे समस्या आणखी वाढतील. ‘प्रदूषणासाठी कृती आराखडा तयार’ - दरम्यान, मुंबईतील वाढत्या प्रदूषणासाठी कृती आराखडा तयार करण्यात आल्याचे बीएमसीच्या पर्यावरण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. यासोबतच शहरात एअर प्युरिफायर टॉवर बसवण्याचे कामही लवकरच करण्यात येणार आहे. ‘अनेक आजारांचा धोका’ प्रदूषणामुळे फुफ्फुस, हृदय, मज्जासंस्था, मेंदू, पचनसंस्था आणि त्वचेवर परिणाम होतो. त्यामुळे दमा, श्वसनाचे इतर आजार, कर्करोग, हृदयविकार, अर्धांगवायूचा धोका असतो, असे काही तज्ञांचे मत आहे. त्यामुळे वाढत्या प्रदूषणामुळे रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. उपचार काय - - खासगी वाहनांच्या वाहतुकीवर मर्यादा आणण्यासाठी सार्वजनिक वाहनांचा अधिक वापर करण्यासाठी धोरण आखले पाहिजे. - इलेक्ट्रिक वाहनांचा जास्तीत जास्त वापर करण्यावर भर दिला पाहिजे. - बांधकामाच्या ठिकाणी निर्माण होणाऱ्या धुळीची विल्हेवाट लावण्यासाठी विशेष उपाययोजना कराव्यात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात