मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /आकाशी उडायचं, नवं घरटं बांधायचं... नव्या भरारीसाठी सत्यजीत तांबे सज्ज!

आकाशी उडायचं, नवं घरटं बांधायचं... नव्या भरारीसाठी सत्यजीत तांबे सज्ज!

सत्यजित तांबे यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण

सत्यजित तांबे यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण

पदवीधर आमदार सत्यजित तांबे यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण आलं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 21 फेब्रुवारी : नाशिक पदवीधर निवडणुकीत सत्यजित तांबे यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज भरला. यावर काँग्रेसने त्यांना पक्षातून निलंबित केलं. तांबे यांनी हार न मानता निवडणुकीत विजय मिळवला. खांद्याला दुखापत झाल्याने दीड महिन्यानंतर संगमनेरमध्ये परतलेल्या बाळासाहेब थोरात यांनी काल सत्यजित तांबे यांचे काँग्रेस पक्षाने केलेले निलंबन मागे घेण्यासंदर्भात सूचक वक्तव्य केलं होतं. मात्र, सत्यजीत यांच्या मनात वेगळाच विचार सुरू असल्याचे त्यांच्या सोशल मीडिया पोस्टवरुन दिसत आहे.

सत्यजित तांबे यांच्या मनात नेमकं काय?

अभिनेता ओंकार भोजने यांचा एक व्हिडीओ शिक्षक आमदार सत्यजित तांबे यांनी शेअर केला आहे. सत्यजीत तांबे यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ओंकार भोजने “तुझी तुलाच पुरी करायची, हौस आकाशी उंच उडायची” ही कविता म्हणताना दिसत आहे. या व्हिडीओला त्यांनी “तुझी तुलाच पुरी करायची, हौस आकाशी उंच उडायची…कमाल गायलंस मित्रा, ओंकार भोजने !” असं कॅप्शन दिलं आहे. या व्हिडीओनंतर राजकीय वर्तुळात मामांच्या वक्तव्यानंतर पक्षात परततील का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

बाळासाहेब थोरातांचं वक्यव्य काय?

थोरातांच्या वक्तव्यानंतर आमदार सत्यजित तांबे यांनी याबाबत प्रतिक्रिया देण्याचे टाळले होते. मात्र त्यांनी केलेले ट्विट पुन्हा चर्चेचा विषय ठरले आहे. 'उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी..नजरेत सदा नवी दिशा असावी.. घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही.. क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी', अशा आशयाचे ट्विट सत्यजीत तांबे यांनी केलंय, त्यामुळे मामा बाळासाहेब थोरात हे सत्यजित यांचे निलंबन मागे घेण्यासाठी प्रयत्नशील असताना सत्यजित तांबे मात्र काँग्रेसमध्ये परतण्यास इच्छुक नाहीत का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतोय.

सत्यजित तांबेंचे नाना पटोलेंवर गंभीर आरोप

विजय झाल्यानंतर सत्यजित तांबे यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केले. तर बाळासाहेब थोरात यांनीही हायकमांडला पत्र पाठवून नाना पटोले यांच्यासोबत काम करणं शक्य नसल्याचं सांगितलं. बाळासाहेब थोरात यांच्या या आक्रमक पवित्र्यानंतर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एचके पाटील मुंबईत आले होते आणि त्यांनी या वादावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. एचके पाटील आणि बाळासाहेब थोरात यांच्यामध्ये बैठकही झाली.

First published:
top videos

    Tags: Balasaheb thorat, Satyajit tambe