समीर भुजबळांचा जामीन हायकोर्टात नामंजूर

समीर भुजबळांचा जामीन हायकोर्टात नामंजूर

मनी लाॅंड्रिंग प्रकरणात फेब्रुवारी २०१६ मध्ये समीर भुजबळ यांना चौकशीनंतर ईडीकडून अटक करण्यात आली होती. खोट्या कंपन्या स्थापन करुन महाराष्ट्र सदनाचं कंत्राट देण्याबद्दल मिळालेल्या लाचेचा पैसा वळवल्याचा समीर भुजबळ यांच्यावर आरोप झाला होता

  • Share this:

09 मे: छगन भुजबळांचे  पुतणे यांचा जामीन हायकोर्टात नामंजूर झाला आहे. एकीकडे भुजबळ सुटले असले तरी  त्यांचा पुतणे मात्र अडकले आहेत. आता या प्रकरणी पुढील सुनावणी 15 मेला होणार आहे.

मनी लाॅंड्रिंग प्रकरणात फेब्रुवारी २०१६ मध्ये समीर भुजबळ यांना चौकशीनंतर ईडीकडून अटक करण्यात आली होती. खोट्या कंपन्या स्थापन करुन महाराष्ट्र सदनाचं कंत्राट देण्याबद्दल मिळालेल्या लाचेचा पैसा वळवल्याचा समीर भुजबळ यांच्यावर आरोप झाला होता. एकूण ७८५ कोटींचा घोटाळा असल्याचा ईडीचा दावा होता. यापूर्वी हायकोर्ट आणि ईडी कोर्टाने जामीन अर्ज फेटाळले  होते.

नोव्हेंबर २०१७ मध्ये पीएमएलए कायद्याचं कलम ४५ असंवैधानिक असल्याचा सुप्रीम कोर्टाचा एका वेगळ्या प्रकरणात निर्णय दिला होता.  त्याचाच आधार घेत ईडी कोर्टात समीर यांचा जामीन अर्ज फेटाळला होता.  त्यानंतर त्यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. आता तिथेही जामीन नामंजूर झाला आहे.

 

First published: May 9, 2018, 8:27 PM IST

ताज्या बातम्या