मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

मुंबईतील कूपर रुग्णालयात नर्सला जबर मारहाण, रुग्णाकडून विवस्त्र करण्याचा प्रयत्न

मुंबईतील कूपर रुग्णालयात नर्सला जबर मारहाण, रुग्णाकडून विवस्त्र करण्याचा प्रयत्न

या प्रकरणात नर्सच्या कानाला जबर मार लागल्याचे सांगितले जात आहे

या प्रकरणात नर्सच्या कानाला जबर मार लागल्याचे सांगितले जात आहे

या प्रकरणात नर्सच्या कानाला जबर मार लागल्याचे सांगितले जात आहे

  • Published by:  Meenal Gangurde
मुंबई, 14 एप्रिल :  मुंबईतील कोरोना (Mumbai Covid - 19) रुग्णांची वाढणारी संख्या ही चिंता वाढवणारी आहे. आज मुंबईतील वांद्रे स्थानकाबाहेर जमा झालेल्या मजुरांची मोठी गर्दी पाहिल्यावर कोरोना कसा रोखायचा हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच मुंबईच्या अंधेरी भागातील कूपर रुग्णालयात मारहाणीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अंधेरीतील कूपर (Andheri) रुग्णालयात दाखल असलेल्या एका महिलेने दुसऱ्या नर्सला मारहाण केल्याची घटना घडली आहे. या नर्सचे कपडे फाडण्यात आल्याची बाब समोर आली आहे. आज दुपारी 2 च्या सुमाराचा हा प्रकार घडला. यावेळी महिलेने नर्सला जबर मारहाण केली आहे. नर्सच्या कानाला फटका बसस्याने तिला ऐकू येत नसल्याची माहिती सांगितली जात आहे. या सर्व प्रकारावर रुग्णालय व्यवस्थापनाकडून कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. देशात कोरोनाबाधितांची(Coronavirus) संख्या वाढत आहे. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 10 हजारांपेक्षा जास्त झाली आहे. तर मृत्यू झालेल्यांची संख्या 339 वर गेली आहे. महाराष्ट्रातल्या रुग्णांची संख्या 2334 एवढी झाली आहे. तर 160 लोकांचा मृत्यू झालाय. यात 101 जण हे फक्त मुंबईमधले आहेत. त्यामुळे चिंता वाढली आहे. प्रचंड लोकसंख्या, दाटीवाटीतली घरं, झोपडपट्ट्या, अस्वच्छता यामुळे कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. तर सर्व देशात प्रत्येक 5वा रुग्ण हा महाराष्ट्रातला आहे. संबंधित - लॉकडाऊनमध्ये मुंबईतून लपून-छपून कोकणपर्यंतचा प्रवास, गावकरी त्रस्त भारतासाठी दिलासादायक बातमी, 1000 पेक्षा जास्त जणांनी कोरोनाला हरवलं!
First published:

पुढील बातम्या