मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

तंबाखू खाणारे कोरोनापासून सुरक्षित? CSIRच्या अहवालातून मोठा खुलासा

तंबाखू खाणारे कोरोनापासून सुरक्षित? CSIRच्या अहवालातून मोठा खुलासा

धूम्रपान किंवा तंबाखू खाणारे लोकं कोरोनापासून सुरक्षित आहेत का? याबाबतचं महत्त्वपूर्ण संशोधन CSIR ने अर्थातच वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेनं केलं आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 30 जून: धूम्रपान किंवा तंबाखू खाणाऱ्या लोकांना कोरोनापासून धोका नसल्याचा खुलासा CSIR ने अर्थातच वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेनं केला आहे. तंबाखूजन्य पदार्थातील निकोटीन नावाचा पदार्थ कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रभावी ठरत असल्याचा खुलासा CSIR च्या एका अहवालात करण्यात आला आहे. या अहवालाचा दाखला देत काही तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणारे व्यापारी आणि विक्रेत्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे तंबाखूजन्य पदार्थांमुळे खरंच कोरोना रोखला जाऊ शकतो का? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

तंबाखूमधील निकोटीन  घटक कोरोनाला प्रतिबंध करण्यास परिणामकारक ठरते, असा दावा करणाऱ्या अहवालाचा दाखला देत तंबाखूजन्य पदार्थांचे व्यापारी आणि विक्रेत्यांनी मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. CSIR च्या अहवालानुसार तंबाखू कोरोना विषाणूच्या लढाईत रामबाण ठरत असेल, तर देशात तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी आणली जाऊ नये, अशी मागणी संबंधित व्यापाऱ्यांनी न्यायालयात केली आहे.

हेही वाचा-मोठी बातमी: ब्राझील सरकारचा धक्कादायक निर्णय, भारताला मोठा झटका

CSIR च्या अहवालातील दाव्यात तथ्य असल्यास केंद्र सरकारनं सिगरेटच्या पाकिटांवरून आरोग्याबाबतचा वैधानिक इशारा हटवायला हवा, असा खोचक टोलाही न्यायालयानं लागावला आहे. तूर्तास वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेनं (CSIR) अद्याप कोणतंही स्पष्टीकरण दिलं नाही. त्यामुळे तंबाखू खाणारे कोरोना विषाणूपासून खरंच सुरक्षित आहेत का? याचा संभ्रम कायम आहे.

First published:

Tags: Corona, Coronavirus, Covid-19, Maharashtra, Mumbai