Home /News /mumbai /

OMG! अमृता फडणवीस यांना चक्क वय जास्त असावं वाटतंय; पाहा काय म्हणतायत

OMG! अमृता फडणवीस यांना चक्क वय जास्त असावं वाटतंय; पाहा काय म्हणतायत

Amruta Fadnavis Twitter: 'आयुष्यात पहिल्यांदाच वय कमी असल्याचं दुःख होतंय...' असं अमृता फडणवीस का म्हणतात वाचा..

    मुंबई, 06 एप्रिल : अमृता फडणवीस (Amruta Fadnavis Tweet) आणि त्यांचे ट्वीट हा गेल्या जवळपास वर्षभरापासूनचा चर्चेचा विषय राहिला आहे. अमृता फडणवीस या अगदी बिनधास्तपणे मनात जे असेल ते पोस्ट करत असतात. अनेकदा यावरून त्यांना सोशल मीडियावर ट्रोलही केलं जात. पण या ट्रोलिंगला न घाबरता अमृता यांनी त्यांचा हा बिनधास्तपणा कायम ठेवला आहे. त्यांच्या याच स्वभावाची झलक त्यांच्या या ताज्या Tweet वरून पाहायला मिळते आहे. सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये संसर्ग अत्यंत झपाट्यानं वाढलेला पाहायला मिळत आहे. कोरोनापासून खबरदारी घेत स्वतःचा बचाव करणं हाच कोरोनापासून वाचण्याचा एकमेव मार्ग आहे. कोरोनावर (Amruta Fadnavis age) लस आलेली असली तरी सध्या केवळ 45 वर्षांच्या पेक्षा जास्त वय असलेल्यांनाच लस दिली जातेय. याच्याशी संबंधित असंच ट्विट अमृता यांनी केलंय. अमृता यांनी मिश्कीलपणे या ट्विटमध्ये असं म्हटलं आहे की, आज मला माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच माझं वय 45 वर्षे किंवा अधिक हवं होतं असं वाटत आहे. कोरोनाच्या लसीकरणाची वाट पाहत आहे, असं अमृता यांनी ट्विटमध्ये म्हटलंय. नव्या अवतारातला कोरोना अधिक भयावह आहे आणि आजुबाजुला सर्वांनाच कोरोना आहे असं वाटू लागल्याचं अमृता यांनी ट्विटमध्ये म्हटलंय. महिलांसाठी वय ही अत्यंत खासगी बात आणि तेवढाच जिव्हाळ्याचा विषय असतो. सहजासहजी महिलांना त्यांचा वय जास्त असावं किंवा जास्त वयाचं दिसावं हे आवडत नाही. पण अमृता फडणवीस यांनी कोरोना लसीकरण आजघडीला किती महत्त्वाचं आहे, हेच अप्रत्यक्षरित्या या पोस्टमधून दाखवून दिलं आहे. आता ट्रोलर्सना पुन्हा त्यांच्यावर भडास काढायची संधी आहे. पण अमृता यांना त्यानं फारसा काही फरक पडत नाही.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Amruta fadnavis, Corona vaccination

    पुढील बातम्या