जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / अमित ठाकरे पहिल्यांदाच पोहोचले चवदार तळ्यावर, बाबासाहेबांच्या पुतळ्याखाली लिहिलेलं 'ते' वाक्य भावलं

अमित ठाकरे पहिल्यांदाच पोहोचले चवदार तळ्यावर, बाबासाहेबांच्या पुतळ्याखाली लिहिलेलं 'ते' वाक्य भावलं

अमित ठाकरे पहिल्यांदाच पोहोचले चवदार तळ्यावर, बाबासाहेबांच्या पुतळ्याखाली लिहिलेलं 'ते' वाक्य भावलं

अमित ठाकरे यांनी एक फोटोही पोस्ट केला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 9 जुलै : गेल्या काही दिवसांपासून मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांचे सुपूत्र अमित ठाकरे (Raj Thackeray’s son Amit Thackeray) राजकारणात सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे. ते आपली भूमिकाही सोशल मीडियाच्या (Social Media ) माध्यमातून पोहोचवत असल्याचं दिसून येत आहे. आरेतील कारशेडबद्दलही त्यांनी आपलं मत मांडलं होतं. अमित ठाकरे यांनी फेसबुकवर एक फोटो शेअर केला होता. यामध्ये त्यांनी मेट्रोचं कारशेड आरेत बनवण्याबाबत आपली भूमिका मांडली आहे. “मेट्रो कारशेड आरे जंगलात करण्याचा नव्या सरकारने घेतलेला निर्णय माझ्यासारख्या असंख्य पर्यावरणप्रेमींसाठी धक्कादायक आहे. आरेमध्ये कारशेड होऊ नये म्हणून शेकडो तरुण-तरुणींनी संघर्ष केला होता. काहींना तर पोलिसांनी गजाआड टाकलं होतं”, असं अमित ठाकरे म्हणाले आहेत. दरम्यान अमित ठाकरेंनी काही वेळापूर्वी एक फोटो शेअर केला आहे. यात ते महाडच्या चवदार तळ्यावर दिसत आहे. बाबासाहेब आंबेडकरांसमोर उभं राहून काढलेला फोटो त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यात त्यांनी लिहिलं आहे की…. महाडच्या ऐतिहासिक चवदार तळ्याचं आज प्रथमच दर्शन घेतलं. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला विनम्र अभिवादन केलं. पुतळ्याच्या खाली बाबासाहेबांचं एक वाक्य कोरलेलं होतं- “हा संगर केवळ पाण्यासाठी नसून मानवी मूलभूत हक्कांसाठी आहे!” खरंच, सामाजिक विषमतेविरोधात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाडमधल्या या तळ्यावर केलेल्या एका क्रांतिकारी कृतीमुळे जगणं बदललं. आपल्या सर्वांचं! त्यांचं हे ट्विट व्हायरल होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात