• VIDEO : अंबरनाथच्या रासायनिक कंपनीत भीषण आग

    News18 Lokmat | Published On: Nov 5, 2018 04:46 PM IST | Updated On: Nov 5, 2018 04:49 PM IST

    अंबरनाथ, 5 नोव्हेंबर : मोरीवली एमआयडीसी भागातील 'प्रिशिया' या रासायनिक कंपनीला सोमवारी दुपारच्या सुमारास भीषण आग लागली आहे. कंपनी सुरू असताना अचानक ही आग लागल्याने कामगारांचा मोठा गोंधळ उडाला. प्रसंगावधान राखत कंपनीतील कामगार बाहेर पडल्याची माहिती मिळते आहे. मात्र काही कामगार आत अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या कंपनीत केमिकलने भरलेले ड्रम असल्याने ते आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने आगीने क्षणार्धात रौद्र रूप धारण केलं. अजूनही कंपनीतल्या केमिकलच्या ड्रम स्फोट होताहेत. चार ते पाच किलोमीटर दूरवरूसुद्धा ही आग दिसत असल्याने तिचं रौद्ररूप स्पष्ट होतं. कंपनीतले रसायन भरलेले ड्रम आगीच्या भक्षस्थानी पडत असल्याने आगीची तीव्रता अधीक वाढली आहे. यक्लोपेंटानोन केमिकल हे केमिकल कंपनीत आहे. हे केमिकल परफ्युम बनवण्यासाठी वापरले जातं. अग्नीशमन दलाच्या १२ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, या आगीत तीन जण जखमी झाले असल्याची माहिती आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading